पुणे विमानतळावर मिळणार ई-बोर्डिंग पास : देशातील पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 01:02 PM2019-02-13T13:02:30+5:302019-02-13T18:35:12+5:30

दोन्ही ठिकाणी ई-गेट बसविले जाणार असून पासवरील बारकोड स्कॅन केल्यानंतरच या गेटमधून प्रवांशाना प्रवेश मिळेल.

E-boarding pass will be available at Pune airport | पुणे विमानतळावर मिळणार ई-बोर्डिंग पास : देशातील पहिला प्रयोग

पुणे विमानतळावर मिळणार ई-बोर्डिंग पास : देशातील पहिला प्रयोग

googlenewsNext
ठळक मुद्देपाच ई-गेटमधून सुरक्षा कक्षात मिळणार प्रवेश मागील काही वर्षांपासून पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वेगाने वाढबनावट तिकीटाच्या आधारे प्रवास करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरणार

पुणे : विमानतळावर प्रवाशांना सुरक्षा कक्ष (सिक्युरिटी एरिया) व बोर्डिंग एरियामध्ये प्रवेशासाठी आता ई-बोर्डिंग पास मिळणार आहेत. दोन्ही ठिकाणी ई-गेट बसविले जाणार असून पासवरील बारकोड स्कॅन केल्यानंतरच या गेटमधून प्रवांशाना प्रवेश मिळेल. प्रायोगिक तत्वावर देशात पहिल्यांदा हा प्रयोग पुणेविमानतळावर राबविला जाणार आहे. याबाबत विमानतळ संचालक अजय कुमार यांनी दुजोरा दिला.
मागील काही वर्षांपासून पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढत आहे. पुढील काही महिन्यांत हा आकडा वार्षिक १ कोटीच्या पुढे जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा वाढविण्यासाठीही विमानतळ प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा डिजिटल माध्यमातून देण्यासाठी पावले टाकली जात आहेत. याअंतर्गत आता ई-बोर्डिंग पासची चाचणी घेण्यासाठी दि ब्युरो ऑफ सिव्ही अव्हीएशन (बीसीएएस) ने मान्यता दिली आहे. देशात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर पुणे विमानतळावर याची चाचणी घेतली जाणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ४५ दिवस चाचणी सुरू राहील. याचा अहवाल ह्यबीसीएएसह्णला सादर केल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. बनावट तिकीटाच्या आधारे प्रवास करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ)वरील ताणही कमी होणार आहे.
विमानतळावरील सुरक्षा कक्षाकडे जाणाऱ्या मार्गावर तीन तर बोर्डिंग एरियाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ई-गेट बसविले जातील. प्रवाशांना ई-बोर्डिंग पास मिळाल्यानंतर सुरूवातीला सुरक्षा कक्षाआधी या गेटवर पासवरील बारकोड स्कॅन केला जाईल. हा बारकोड योग्य असल्यास गेट उघडले जाईल. त्याचप्रमाणे सर्व सुरक्षा तपासणी झाल्यानंतर बोर्डिंग एरियाकडे जातानाही हीच प्रक्रिया केली जाईल. बारकोडमध्ये प्रवाशाची संपुर्ण माहिती असेल. सध्या सीआयएसएफला सर्व प्रवाशांचे बोर्डिंग पास बारकाईने तपासावे लागतात. आता बारकोड स्कॅन झाले की आपोआप गेट उघडले जाईल. त्यामुळे याठिकाणी प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. 
-----------
विमानतळ संचालक अजय कुमार यांनीही ई-गेटच्या प्रयोगाला दुजोरा दिला. देशात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जाणार आहे. याबाबची प्रक्रिया सुरू असून लवकरच याबाबतची माहिती प्रसिध्द केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: E-boarding pass will be available at Pune airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.