आधी सचिन-विराटची सेंच्युरी बघितली, आता पेट्रोल-डिझेलचे शतक बघतोय, उद्धव ठाकरेंचा केंद्रावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 09:33 PM2021-02-28T21:33:35+5:302021-02-28T21:45:03+5:30
पेट्रोल-डिझेलच्या दरांत वेगाने वाढ होत आहे. फब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दर 4.87 रुपयांनी तर डिझेलचे दर 4.99 रुपयांनी वाढले. या महिन्यात कंपन्यांनी आतापर्यंत तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. (Petrol-Diesel Prices)
मुंबई - देशभरात पेट्रोल-डिझेल (petrol and diesel) दरवाढीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांतील नेते ट्विटरपासून ते रस्त्यापर्यंत या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधत आहेत. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या शतकाचा उल्लेख केला. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांत पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. (CM Uddhav Thackeray said saw the century of virat sachin now seeing the century of petrol and diesel)
ठाकरे म्हणाले, ''पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. आपण विराट कोहली-सचिन तेंडुलकरची सेंच्युरी पाहिली. मात्र आता पेट्रोल-डिझेलचे शतक पाहत आहोत.'' सध्या प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी नव्हे एवढ्या वाढल्या आहेत. राजस्थानातील श्रीगंगानगर नंतर बिकानेरमध्येही पेट्रोल 100 रुपयांच्याही पार गेले आहे. पेट्रोल 100.01 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.09 रुपये प्रति लिटरवर गेले आहे.
एका महिन्यात जवळपास पाच रुयांनी महागलं पेट्रोल -
पेट्रोल-डिझेलच्या दरांत वेगाने वाढ होत आहे. फब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दर 4.87 रुपयांनी तर डिझेलचे दर 4.99 रुपयांनी वाढले. या महिन्यात कंपन्यांनी आतापर्यंत तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. दिल्लीत पेट्रोल 91.17 आणि डिझेल 81.47 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. यापूर्वी डिझेलचा दर 30 जुलै 2020 रोजी 81.94 रुपयांवर गेला होता. तर, मुंबईत पेट्रोलच्या किंती 97.57 रुपयांवक तर डिझेल 88.60 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
Petrol and diesel prices have gone up. We have seen centuries by Virat Kohli-Sachin Tendulkar but now we are seeing petrol-diesel century: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/T8ljMvUZnH
— ANI (@ANI) February 28, 2021
Pooja Chavan Suicide Case: शिवसेना खून, बलात्कार करणाऱ्यांना पाठिशी घालतेय; नारायण राणेंचा आरोप
संजय राठोडांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले, उद्धव ठाकरे -
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात रान उठवले होते, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी, सरकार चालवताना न्यायाने वागावं ही आमची जबाबदारी आहे. तपास झालाच पाहिजे, परंतु गेल्या काही दिवसांत गलिच्छ राजकारण सुरू झालं आहे, चौकशीत दोषी असेल तर कोणी कितीही मोठा असेल तर शिक्षा होणारच आहे, एखाद्याला आयुष्यातून उठवायचं असेल असा न्याय नको, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.