मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी) घटकातील पात्र विद्यार्थ्यांकरिता सध्या असलेली एक लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून अडीच लाख रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. सतीश चव्हाण, धनंजय मुंडे यांनी याबाबत नियम ९३ अन्वये सूचना दिली होती. ईबीसी विद्यार्थ्यांना या योजनेत खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयात शासकीय कोट्यातून प्रवेश घेतल्यावर शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के रकमेची प्रतिपूर्ती केली जाते. यापुढे ही उत्पन्न मर्यादा अडीच लाख असेल.या योजनेंतर्गत २०११-१२ ते २०१४-१५ या कालावधीत ३३ हजार ६१६ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. वसंतराव नाईक व मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत याच कालावधीत एकूण १०,६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.(विशेष प्रतिनिधी)
ईबीसीची मर्यादा अडीच लाख
By admin | Published: July 24, 2015 2:32 AM