मुंबईतील सर्व्हेत शिंदे की ठाकरे, कोणाला जास्त जागा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 07:53 AM2023-06-05T07:53:49+5:302023-06-05T07:54:09+5:30

सध्या लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी जे उत्तम काम करतील त्यांचा आमदारकीसाठी विचार करणार आहोत, असेही पवार म्हणाले. 

Eknath Shinde or uddhav Thackeray win survey in Mumbai election, who has more seats? Ajit Pawar clearly said... | मुंबईतील सर्व्हेत शिंदे की ठाकरे, कोणाला जास्त जागा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले...

मुंबईतील सर्व्हेत शिंदे की ठाकरे, कोणाला जास्त जागा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले...

googlenewsNext

भाजपा मुंबई महानगरपालिकेवर आपला ताबा मिळवू पाहत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरेंना शिंदे गटा-भाजपापेक्षा जास्त जागा मिळत असल्याचे समोर आले आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत. 

जनतेने शिवसेनेला कौल दिला होता. आताचे वातावरण पाहिले तर उद्धव ठाकरेंना निश्चितपणाने सहानुभूती आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नुकतेच येऊन गेलेत. भाजपा खूप प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी ही मुंबई शहरात खुप काही ताकदवान नाहीय. आमचे खुप कमी आमदार निवडून येतात. यामुळे आम्ही आपण एकत्रितपणे निवडणुकीला समोर जाऊ असे म्हणालो आहोत. त्यावर ठाकरे विचार करू असे म्हणाले आहेत, असे पवार म्हणाले. 

गद्दारी करून 145 आकडा गाठल्याने मुख्यमंत्री झाल्याचे आपण पाहिलेय. 2004 अपवाद ठरले, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला आहे. प्रकाश आंबेडकर यांची आमच्याबद्दलची मते तशीच असतात. त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. प्रयत्न करत राहणे आमचे काम आहे. प्रकाश आंबेडकरांबाबत आम्ही उद्धव ठाकरेंना जमत असेल तर जमवून घ्या, असे म्हटले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. 

सध्या लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी जे उत्तम काम करतील त्यांचा आमदारकीसाठी विचार करणार आहोत, असेही पवार म्हणाले. 

Web Title: Eknath Shinde or uddhav Thackeray win survey in Mumbai election, who has more seats? Ajit Pawar clearly said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.