25 Jun, 22 09:46 PM
लोकशाही आपल्या देशात राहिलीये का हा विचार केला पाहिजे - आदित्य ठाकरे
दगाफटका खुप झाला, जे फुटीरतावादी आहेत हे त्यांना कसं वागवतात कैद्यांसारखं हे पाहायला पाहिजे. त्यांना जेलमध्ये असल्यासारखं वागवलं जातंय. लोकशाही अशी चिरडली गेली तर आपण नागरिक म्हणून करणार काय. जागतिक, राष्ट्रीय पातळीवर विचार पाहिजे. लोकशाही आपल्या देशात राहिलीये का हा विचार केला पाहिजे - आदित्य ठाकरे
25 Jun, 22 09:44 PM
... त्यांना आपण परत घेऊ शकतो - आदित्य ठाकरे
काही लोक तिकडून मेसेज करतायत त्यांना आपण परत घेऊ शकतो. पण ज्यांनी बंड केलंय त्यांना महाराष्ट्रात परत येणं नाही ही शपथ घेऊन चाललो पाहिजे - आदित्य ठाकरे
25 Jun, 22 09:43 PM
त्यांना दोनच पर्याय - आदित्य ठाकरे
सत्ताधारी पक्षातून सदैव विरोधी पक्षात बसणार, तिकडे हे जायला निघालेत. यांना दोनचं उपाय भाजपमध्ये जा किंवा प्रहारमध्ये. प्रत्येक ठिकाणी शिवसनेनेचे उमेदवार तयार आहेत आणि जिंकण्यास तयार आहेत - आदित्य ठाकरे
25 Jun, 22 09:11 PM
हिंमत होती तर, इथे राहून बंड करायचं होतं - संजय राऊत
हिंमत होती तर, इथे राहून बंड करायचं होतं. ज्या भाजपनं शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. बाळासाहेबांचा आत्मा तुम्हाला माफ करणार नाही - संजय राऊत
25 Jun, 22 08:34 PM
सावंतवाडीतील केसरकरांच्या कार्यालयावर दगडफेक, शिवसैनिक आक्रमक
शनिवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडीतील आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर एकाने दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली. त्याला लागलीच पोलिसांनी ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर सावंतवाडी शहरातील पोलीस बंदोबस्त ही वाढविण्यात आला आहे.
25 Jun, 22 06:55 PM
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय - राऊत
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. हिंदुत्व वगैरे हे संगळं तोंडी आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजपनं रोखलं आहे. जर भाजपनं आश्वासन पाळलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. - संजय राऊत
25 Jun, 22 05:39 PM
महाराष्ट्र धमक्या खपवून घेणार नाही- श्रीकांत शिंदे
आम्ही फक्त एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या शिकवणीवरून शांत आहोत. आम्हाला भडकावण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्र कोणत्याही धमक्या खपवून घेणार नाही - श्रीकांत शिंदे
25 Jun, 22 05:51 PM
कोरोनाच्या काळातही एकनाथ शिंदेंनी पायाला भिंगरी लावून काम केलं - श्रीकांत शिंदे
कोरोनाच्या काळातही एकनाथ शिंदेंनी पायाला भिंगरी लावून काम केलं. ते घरी बसले नाही. वेळ पडली तेव्हा पीपीई किट घालून ते रुग्णालयात गेले. अशात त्यांना दोनदा कोविडही झाला. आठवतंय कल्याणचे महानगर प्रमुख बंड्या साळवी यांना कोविड झाला. परिस्थिती त्यांची वाईट होती. तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन केला, भेटायला या. तेव्हा त्यांनी पीपीई किट घालून त्यांना भेटायला गेले. मुलाच्या डोक्यावर हात फिरवतात तसं ते तिकडे होते. त्यांनी फोनवरून खोटं आश्वासन दिलं नाही. - श्रीकांत शिंदे
25 Jun, 22 04:48 PM
देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की ते आमचा विचार करायचे, पण आताच्या सरकारमध्ये केला जात नव्हता- दीपक केसरकर
25 Jun, 22 04:45 PM
संजय राऊतांवर निशाणा
ज्या व्यक्तीने रस्त्यावर उतरायला सांगितलं त्यावर महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली नाही. अन्य व्यक्तीने असं सांगितलं असतं तर कारवाई केली असती की नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे नेतृत्व करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचे नॉर्म पाळावेत ही आमची विनंती आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.
25 Jun, 22 04:41 PM
संजय राऊत आमचे विधीमंडळाचे नेते नाहीत. त्यांच्यावर मी का बोलू- दीपक केसरकर
25 Jun, 22 04:30 PM
आम्ही कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही, तशी गरजच नाही. दोन तृतियांश बहुमत आम्ही सिद्ध करू शकतो. आम्हीच शिवसेना आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना हायजॅक करायचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचं अस्तित्व टिकावं म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.
25 Jun, 22 04:28 PM
आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक, शिवसेना सोडलेली नाही- दिपक केसरकर
"आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही शिवसेनेच्याच तिकीटावर निवडून आलेले आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडल्याच्या चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत", असं स्पष्टीकरण दिपक केसरकर यांनी दिलं आहे.
25 Jun, 22 03:55 PM
ही तांत्रिक लढाई आहे. बंडखोरांना सोडायचं नाही, त्यांना ओढायचं आहे: अंबादास दानवे
25 Jun, 22 03:44 PM
शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि यापुढेही राहील- संजय राऊत
25 Jun, 22 03:33 PM
शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
25 Jun, 22 03:32 PM
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्वाचा निर्णय
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे.
25 Jun, 22 03:30 PM
पालघर- बोईसरमध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर शिवसैनिकांनी गद्दार लिहून आपला रोष व्यक्त केला
25 Jun, 22 02:55 PM
मुंबईत कलम १४४ लागू
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १० जुलैपर्यंत कलम १४४ लागू करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे.
25 Jun, 22 02:54 PM
उद्धव ठाकरेंची टीका
"आधी नाथ होते आता दास झाले. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा. बाळासाहेबांचं नाव वापरू नका", उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
25 Jun, 22 02:31 PM
एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट, महाविकास आघाडी तोडण्याची कार्यकर्त्यांची मागणी
25 Jun, 22 01:58 PM
उद्धव ठाकरे बैठकीसाठी शिवसेना भवनात पोहोचले
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले आहेत. या बैठकीत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यात एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
25 Jun, 22 01:48 PM
आर्थिक व्यवहारातून शिंदे गटाची बंडखोरी - अनंत गीते
आर्थिक व्यवहारातून शिंदे गटाने बंडखोरी केली असल्याचा आरोप रायगडचे माजी खासदार अनंत गीते यांनी केला.
25 Jun, 22 01:05 PM
एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं, शिवसैनिकांचा नावाला विरोध
एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरल्याची चर्चा असून शिवसेना-बाळासाहेब ठाकरे गट असं त्यांच्या गटाचं नाव असून याबाबतची घोषणा आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत केली जाणार आहे.
25 Jun, 22 12:58 PM
'...तेव्हा मुख्यमंत्रीसुद्धा अचंबित झाले'; बंडखोर आमदारानं 'वर्षा'वरील बैठकीचा किस्साच सांगितला!
25 Jun, 22 11:49 AM
बंडखोरांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही- संजय राऊत
गुवाहाटीमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांनी तसं एक पत्रच ट्विट करत आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं म्हटलं आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही, असं रोखठोक मत व्यक्त केलं. "बंडखोरी करुन राज्यातून पळून गेलेल्या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. आमदारांना सुरक्षा असते त्यांच्या कुटुंबीयांना नसते आणि हे तर राज्यातून पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही", असं संजय राऊत म्हणाले.
25 Jun, 22 11:26 AM
एकनाथ शिंदेंचा नवा आरोप
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आमदारांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचंही शिंदे म्हणाले आहेत. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहिलं आहे.
25 Jun, 22 11:24 AM
फडणवीसांनी आमच्या झमेल्यात पडू नये- संजय राऊत
"देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहेत. मी त्यांना एकच सल्ला देईन तुम्ही आमच्या झमेल्यात पडू नका. नाहीतर पुन्हा एकदा फसाल. याआधी पहाटेच्या शपथविधीनं तुमच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचला आहे. आता पुन्हा एकदा तसं झालं तर तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळेल. आमचे राजकीय मतभेद असले तरी फडणवीस आमचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी प्रतिष्ठा सांभाळावी. कारण आमच्या झमेल्यात पडलात तर फसाल", असं संजय राऊत म्हणाले.
25 Jun, 22 11:23 AM
मातोश्रीवरील बैठकीत बंडखोर १० आमदार सहभागी- संजय राऊत
सध्या राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर पुढील निर्णय आणि रणनिती ठरविण्यासाठी काल रात्री 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत गुवाहटीत असलेले १० आमदार देखील फोनवरुन संपर्कात होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
25 Jun, 22 09:26 AM
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, मोठे निर्णय होणार
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होणार असून या बैठकीत बंडखोरांविरोधात मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टीचा निर्णय बैठकीत घेतला जाऊ शकतो. तसंच पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. दुपारी १ वाजता बैठक होणार आहे.
25 Jun, 22 07:50 AM
तब्बल १० तासांनंतर फडणवीस मुंबईत
देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला गेले होते. त्यानंतर १० तासानंतर ते पुन्हा मुंबईत परतले आहेत. भाजपाच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. फडणवीस नेमके कुणाला भेटले याची चर्चा आता सुरू झाली आहे
25 Jun, 22 07:49 AM
राज्यातील सत्ता संघर्षाच्या घडामोडींना आज वेग येण्याची शक्यता
एकनाथ शिंदे गटानं बंड पुकारल्यानंतर आज पाचव्या दिवशी राज्यात हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. काल रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक झाली. तर दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत खलबतं सुरू होती.
24 Jun, 22 10:36 PM
भाजपमध्ये जाण्यासाठी एकनाथ शिंदेंवर दबाव: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:36 PM
या आव्हाला गाडून पुढे जायचे आहे: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:36 PM
पुन्हा विजयी होईपर्यंत शिवसेना थांबणार नाही: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:35 PM
शिवसेनेला सतत लढत राहण्याची सवय आहे: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:34 PM
शिवसेना तलवारीसारखी, तलवार तळपण्याची ही स्थिती निर्माण झाली आहे: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:34 PM
तुमच्यामुळे सर्व आमदार निवडून आले आहेत: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:34 PM
शिवसेना संपवण्याचा डाव आखला जातोय: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:32 PM
शेराला सव्वाशेर भेटतोच, ती वेळ आता आली आहे: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:32 PM
पदाचा मोह तेव्हाही नव्हता, आताही नाही: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:32 PM
या बंडामागे मी मुळीच नाही: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:31 PM
हिंदुत्वाच्या मुद्द्यात भाजपला दुसरे कोणी नको: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:31 PM
कारवायांना घाबरून आमदार निघून गेलेत: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:31 PM
शिवसैनिकांना नको असेल तर पक्षप्रमुखपदाचा राजीनामा देतो: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:31 PM
आज ते जातील पण उद्याची निवडणूक शिवसेनेची आहे: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:30 PM
एकनाथ शिंदेंशी चर्चासुद्धा केली होती: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:30 PM
शिवसेना एक विचार आणि तोच संपवण्याचा भाजपचा डाव: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:30 PM
आपल्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला: उद्धव ठाकरे
24 Jun, 22 10:00 PM
महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये एकजुटीने लढायचे आहे: आदित्य ठाकरे
24 Jun, 22 09:59 PM
जे आपल्याला सोडून गेले आहेत, त्यांचा आता विचार करायचा नाही: आदित्य ठाकरे
24 Jun, 22 09:59 PM
प्रत्येक लढाई आता जिंकण्यासाठी करायची आहे: आदित्य ठाकरे
24 Jun, 22 09:58 PM
उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन बंड केले - आदित्य ठाकरे
24 Jun, 22 09:50 PM
मातोश्रीवरील शिवसेना आमदारांची बैठक संपली; संजय राऊत होते सहभागी
24 Jun, 22 09:36 PM
मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! योगेश कदम
24 Jun, 22 08:25 PM
शरद पवार मातोश्रीहून रवाना; उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपली
शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंसोबतची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे खासदार, आमदार तसेच महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
24 Jun, 22 08:23 PM
महाधिकवक्ता आशुतोष कुंभकोणी विधिमंडळात दाखल; शिंदे गटावर कारवाई करण्याच्या हालचाली
24 Jun, 22 06:52 PM
कुडाळकर यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड
24 Jun, 22 05:46 PM
उद्धव ठाकरेंना गुवाहटीवरुन बोलवन, मुख्यमंत्र्यांनीच दिले निमंत्रण
24 Jun, 22 04:14 PM
शिंदे गटाला प्रहारमध्ये जावं लागेल
शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाला भाजपा किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावं लागेल, असे विधानपरिषद सभापती आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. शिंदे गटाला भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं.
24 Jun, 22 03:58 PM
कोल्हापुरात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर
24 Jun, 22 03:40 PM
एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना
एकनाथ शिंदे गुवाहाटीहून दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दिल्लीत कुणाची भेट घेणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे
24 Jun, 22 03:31 PM
"ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे पण षंढ नाही. ज्यांची स्वप्न होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. सेनेची मूळं आज माझ्यासोबत आहेत. झाडाच्या फांद्या, फुलं, फळं न्या...पण तुम्ही मूळं नेऊ शकत नाही"
- उद्धव ठाकरे
24 Jun, 22 03:30 PM
"बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा...आपल्यासोबत आता कुणीच नाही या मानसिकतेतून शिवसेना वाढवा. पहिला नारळ फुटला तशीच परिस्थिती आज आहे असं समजा. आजपासून तुम्हाला माझ्यासोबत नव्यानं सुरुवात करायची आहे. ज्यांना अजूनही वाटतंय की तिथं जाऊन फायदा आहे त्यांनी आताच सांगा. खुशाल जा. आजपासून पक्षाचा नारळ वाढवला आहे असं समजा आणि सुरूवात करा"
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
24 Jun, 22 03:19 PM
ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा- उद्धव ठाकरे
ज्या बाळासाहेबांनी आणि शिवसेनेनं तुम्हाला दिलं आज तुम्ही त्यांच्यासोबतच गद्दारी करत आहात. ठाकरे आणि शिवसेना नाव न घेता तुम्ही जगून दाखवा, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता दिलं आहे.
24 Jun, 22 03:07 PM
आदित्य ठाकरेंना बडवे म्हणणाऱ्यांना चपराक
"आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का. आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालतं. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावसं वाटतं मग मला वाटणार नाही का. या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता डोक्यात हाणणार", असं रोखठोक विधान करत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
24 Jun, 22 03:06 PM
उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना मार्गदर्शन
"मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
24 Jun, 22 01:26 PM
अजय चौधरी यांची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीस मंजुरी
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेकडून अजय चौधरी यांची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीस मंजुरी दिली.
24 Jun, 22 01:11 PM
देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजपाची खलबतं
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील 'सागर' या निवासस्थानी भाजपाचे नेत्यांची रिघ लागली आहे. भाजपा नेत्यांची फडणवीसांच्या उपस्थितीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खलबतं सुरू झाली आहेत.
24 Jun, 22 12:54 PM
एकनाथ शिंदे रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले
एकनाथ शिंदे अखेर गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मोठ्या सुरक्षा व्यवस्थेसह बाहेर पडले आहेत. ते नेमके कुठे निघालेत याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण जवळच्याच कामाख्या देवीच्या दर्शनाला ते निघाल्याची शक्यता आहे.
24 Jun, 22 12:06 PM
कोल्हापुरात शिवसैनिकांचं शिंदेंविरोधात शक्तीप्रदर्शन
कोल्हापुरातील शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठिंशी, शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन, जोरदार घोषणाबाजी
24 Jun, 22 11:49 AM
शिवसेनेचे आता नगरसेवक आणि पदाधिकारी फोडण्यास सुरुवात झाल्याची चर्चा
शिवसेनेचे आमदार आणि खासदार फुटल्यानंतर आता नगरसेवक, जिल्हा सदस्य फोडण्यास एकनाथ शिंदे गटानं सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.
24 Jun, 22 10:26 AM
राज्यातील सध्याच्या घडामोडींमध्ये भाजपाचा हात नाही- चंद्रकांत पाटील
राज्यात शिवसेनेतील बंडात भाजपाचा हात नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
24 Jun, 22 09:45 AM
आमच्याकडे बहुमत आम्ही कायदेशीरबाबी पूर्ण केल्यात- एकनाथ शिंदे
आम्हाला जे बहुमत हवं होतं ते आज आमच्यासोबत आहे. त्यामुळे सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी आता पूर्ण झाल्या आहेत. आज सर्व आमदारांची बैठक होणार आहे. यात महत्वाचे निर्णय घेतले जातील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
24 Jun, 22 08:56 AM
जळगावात बंडखोर गुलाबराव पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन!
मंत्री गुलाबराव पाटलांनी बंडखोरी केल्याने धरणगावातील शिवसैनिक संतप्त, प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत नोंदवला निषेध...
24 Jun, 22 08:34 AM
शिंदे गटातील आमदारांची संख्या आज ५० वर पोहोचण्याची शक्यता
24 Jun, 22 08:21 AM
शिवसेना आमदार भास्कर जाधवही नॉट रिचेबल
गुहागरचे आमदार भास्कर जाधव देखील आता नॉट रिचेबल असून तेही शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाल्याची चर्चा आहे.
24 Jun, 22 08:20 AM
काँग्रेस नेते झिशान सिद्दीकी यांचा इशारा
आमच्या खामोशीला कमजोरी समजू नका, काँग्रेसच्याच पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, असं वक्तव्य काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी केलं आहे. शिवसेनेला जर भाजपासोबत जायचं असेल तर गेली अडीच वर्ष त्यांनी भाजपाविरोधात जी विधानं केली ती का केली?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
24 Jun, 22 08:11 AM
BLOG: फक्त एक फोन अख्ख्या महाराष्ट्रात नवं वादळ निर्माण करेल!
24 Jun, 22 08:05 AM
शिंदे गट आज राज्यपालांना पत्र देण्याची शक्यता
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात शिंदे गटाकडून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे. तसंच सत्ता स्थापनेचाही दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे.