औरंगाबाद : मुख्यमंत्री, मंत्री हे केंद्रातून हाकलले जातात. रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नियंत्रण आहे. कोणाला काही बोलू दिले जात नाही. देशात ही एकप्रकारे आणीबाणीची परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपचा पोरखेळ सुरू आहे, या शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा गुरुवारी तापडिया नाट्यमंदिरात झाला. यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, देशात सध्या सदृृढ लोकशाही नाही. केंद्र सरकार विकासकामे दाखवू शकत नाही. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दंगली घडविल्या जातात. पुढेही हाच धोका आहे. नोटाबंदीनंतर साडेतीन कोटी लोकांच्या नोकºया गेल्या. १६ लाख कोटींचा काळा पैसा बाहेर आल्याचे सांगत होते. प्रत्यक्षात आता नव्या नोटांचे १८ लाख कोटी रुपये काळा पैसा फिरत असल्याचा अहवाल आहे.काँग्रेस- राष्टÑवादी परवडलीमोदी एक वेळ परवडतील; परंतु मोदीभक्त नको. खोटं बोलणारं सरकार असून, राष्ट्रवादी काँग्रेस-काँँग्रेस परवडेल, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शिवसेना-भाजप एकमेकांवर आरोप करतात. केंद्र सरकारवर अविश्वास ठराव येत आहे. त्यात शिवसेना काय करते, हे पाहायचे आहे. शिवसेना नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहे. आता काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले.महापालिका खाऊन रिकामी करण्यासाठी आहे का?औरंगाबादेत कचऱ्याचा प्रश्न भीषण बनला आहे. नाशिक महापालिका ५ वर्षे मनसेच्या हातात होती. कचरा व्यवस्थापनाचे तेथे केलेले नियोजन जाऊन बघितले पाहिजे. ज्यांच्या हातात २५ ते ३० वर्षे शहराची सत्ता दिली, त्यांच्याकडून हे झाले नाही. शहर वाढण्याऐवजी बकाल होत आहे. महापालिका खाऊन फक्त रिकामी करण्यासाठी आहे का,असा सवाल राज यांनी पत्रकार परिषदेत केली.
देशात आणीबाणीची परिस्थिती; राज्यात सेना भाजपचा पोरखेळ- राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 3:47 AM