बारावीचा निकाल : इंग्रजी विषयात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.४० टक्केदिगांबर जवादे /गडचिरोली : इंग्रजी विषयाचे नाव घेताच राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना घाम फुटत होता. मात्र, या विषयाने यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत चांगलीच साथ दिली आहे. राज्यात या विषयात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण तब्बल ९३.४० टक्के आहे. तर नागपूर बोर्डाचा इंग्रजी विषयाचा निकाल ९१.७८ टक्के एवढा आहे. मागील अनेक वर्षातील उच्चांक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषेचे महत्व लक्षात घेऊन हा विषय अगदी पहिल्या वर्गापासूनच सक्तीचा करण्यात आला आहे. इंग्रजी हा विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून एक कटकट बनला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तर या विषयाचे नाव घेताच घाम फुटतो. निकाल पाडणार्या या विषयाने यावर्षीच्या निकालात मात्र विद्यार्थ्यांना चांगलीच साथ दिली आहे. राज्यभरातून ११ लाख ९० हजार १२१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ११ लाख ११ हजार ५३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर बोर्डाचा इंग्रजी विषयाचा निकाल ९१.७८ टक्के एवढा आहे. बोर्डनिहाय निकालबोर्डाचे नाव इंग्रजीचा निकालनागपूर ९१.७८पूणे ९३.८२औरंगाबाद ९३.९३मुंबई ९३.८५कोल्हापूर ९४.०६अमरावती ९३.७५नाशिक ९०.९२लातूर ९४.२९कोकण ९६.८५तोंडी परीक्षेने सावरला निकाल४मागील काही वर्षापासून इंग्रजी विषयासाठी तोंडी परीक्षा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ८० गुण लेखी परीक्षेसाठी व २० गुण तोंडी परीक्षेसाठी ठेवण्यात आले आहेत. तोंडी परीक्षेचे गुण देण्याचा अधिकार महाविद्यालयाकडे देण्यात आला आहे. तोंडी परीक्षेचे गुण १५ ते २० या दरम्यान दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत २० पेक्षाही कमी गुणांची गरज भासते. विद्यार्थी एकाच विषयात नापास असेल तर १५ गुणापर्यंत ग्रेसही दिल्या जाते. त्यामुळे विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १० पेक्षा कमी गुण मिळाले तरी सदर विद्यार्थी उत्तीर्ण होतो. यामुळे मागील काही दिवसांपासून इंग्रजी विषयाच्या निकालाची टक्केवारी वाढत असल्याचे दिसून येते.
राज्यातील विद्यार्थ्यांची इंग्रजी सुधारली
By admin | Published: June 05, 2014 12:38 AM