शेगाव (बुलडाणा) - राज्यातला शेतकरी होरपळत असताना, मुंबईत भाजपा स्थापना दिवसावर ५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हे कोणते लोकाभिमुख सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.व्हिजन-२०१९ अंतर्गत काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात त्यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाने या देशाला घडविले असून, धर्मनिरपेक्षतेची भूमिका ठेवून सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम काँग्रेस पक्षाकडून केले जात आहे. त्याकरिता जातीय सलोखा कायम असावा, म्हणून येत्या ९ एप्रिलला राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही केले जाणार आहे.भाजपा सत्तेवर आल्यापासून जातिवादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे राज्यात अराजकता माजत आहे, तर कोरेगाव भिमासारख्या प्रकरणालाही खतपाणी घालण्याचे काम भाजपाकडून करण्यात येत आहे.राज्य होरपळतयसंपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत असताना, भाजपा पक्ष स्थापना दिवसावर ५० कोटी रुपये खर्च करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
स्थापना दिवसावर ५० कोटी! अशोक चव्हाण यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 4:44 AM