विठ्ठल मंदिराचा सव्वाशे हेक्टर भूखंड सापडला
By admin | Published: December 3, 2014 03:55 AM2014-12-03T03:55:02+5:302014-12-03T03:55:02+5:30
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला दान करण्यात आलेल्या व खासगी नागरिकांच्या ताब्यात असलेल्या ५०० हेक्टर भूखंडांपैकी १२१़६० हेक्टर भूखंडांचा ताबा घेतला
मुंबई : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला दान करण्यात आलेल्या व खासगी नागरिकांच्या ताब्यात असलेल्या ५०० हेक्टर भूखंडांपैकी १२१़६० हेक्टर भूखंडांचा ताबा घेतला असल्याची माहिती मंदिर समितीने प्रतिज्ञापत्र सादर करून उच्च न्यायालयाला दिली आहे़
मंदिर समितीचे विशेष अधिकारी शिवाजी कडबने यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे़ या प्रतिज्ञापत्रात हे भूखंड ताब्यात घेण्यासाठी केलेल्या प्रक्रियेचा तपशील दिलेला आहे़ त्यामुळे या प्रकरणी दाखल याचिकेवर येत्या सोमवारी न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ हिंदू जनजागृती समितीने अॅड़ वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे़ मंदिराला दान केलेल्या ५०० हेक्टर भूखंडाचा शोध घेऊन त्याचा वापर मंदिरात येणाऱ्या भक्तांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)