‘आप’मध्ये आता सर्वकाही आलबेल, मतभेद मिटले!

By admin | Published: June 8, 2014 12:30 AM2014-06-08T00:30:47+5:302014-06-08T00:30:47+5:30

आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये असलेले सर्व मतभेद आता संपुष्टात आलेले आहेत, असा दावा करून अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पक्षांतर्गत कलह शांत करण्याचा प्रय} केला.

Everything else will come in 'A', the differences have disappeared! | ‘आप’मध्ये आता सर्वकाही आलबेल, मतभेद मिटले!

‘आप’मध्ये आता सर्वकाही आलबेल, मतभेद मिटले!

Next
>केजरीवाल यांचा दावा : शाजियांना पक्षात परत आणण्याचा प्रय} करणार
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये असलेले सर्व मतभेद आता संपुष्टात आलेले आहेत, असा दावा करून अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पक्षांतर्गत कलह शांत करण्याचा प्रय} केला. पक्षाची पुनर्रचना करण्याचा प्रस्तावही केजरीवाल यांनी दिला आहे.
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची शनिवारी लागोपाठ दुस:या दिवशी बैठक झाली. आता सर्वकाही सुरळीतपणो सुरू आहे आणि लवकरच पक्ष संघटनेची पुनर्रचना करण्यात येईल, असा दावा केजरीवाल यांनी केला. या पुनर्रचनेअंतर्गत आपच्या राजकीय कामकाज कमिटीचीही पुनर्रचना केली जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीला आपच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केल्याच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. राजीनाम्यावर रविवारी चर्चा केली जाईल. आता सर्व काही सुरळीतपणो सुरू आहे आणि सर्व मतभेद मिटविण्यात आले आहेत. संघटनात्मक रचनेवर आम्ही चर्चा करीत आहोत. राजकीय कामकाज कमिटीचा विस्तार केला जाऊ शकतो, असे केजरीवाल यांनी सांगितले.
शाजिया इल्मी यांना पक्षात परत आणण्याचे प्रय}ही केले जातील, असे ते म्हणाले. या बैठकीला देशभरातील आप नेते हजर होते. लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी आणि आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी डावपेच आखण्याच्या संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती.
तत्पूर्वी केजरीवाल यांनी टि¦ट करून पक्षातील संघर्ष झाकण्याचा प्रय} केला. योगेंद्र यादव यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि या मुद्यांवर तोडगा काढण्याची गरज आहे, असे केजरीवाल म्हणाले. 
 योगेंद्र यादव हे माङो चांगले मित्र आणि सन्मानित सहकारी आहेत. त्यांच्यासोबत दीर्घ चर्चा झालेली आहे. आम्ही शाजियांनाही परत आणण्याचा प्रयत्न करू,’ असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4प्रमुख रणनीतीकार मानले जाणारे इल्मी आणि यादव यांनी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर केजरीवाल यांच्यावर प्रखर टीका केली होती. पक्षात व्यक्तिवादाला महत्त्व आले आहे, अशी टीका यादव यांनी केली होती. 
4केजरीवाल यांना ‘चौकडी’ने वेढले आहे आणि पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे, असे इल्मी म्हणाल्या होत्या. दरम्यान केजरीवाल यांना लक्ष्य बनविल्याबद्दल आणि पक्षांतर्गत मुद्दे सार्वजनिक केल्याबद्दल मनीष सिसोदिया यांनी यादव यांच्यावर टीका केली होती.

Web Title: Everything else will come in 'A', the differences have disappeared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.