JOB Alert: परीक्षा, मुलाखत नाही! पोस्टाकडून महाराष्ट्रात मोठी भरती; 10 वी पास साठी सुवर्णसंधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 07:42 PM2021-05-25T19:42:33+5:302021-05-25T19:43:08+5:30
India Post Recruitment 2021, GDS Jobs: बिहार आणि महाराष्टात एकूण 4368 ग्रामीण डाक सेवकांची (Gramin dak sevak)रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार खाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन भरतीची जाहिरात पाहू शकता.
India Post Recruitment 2021, GDS Jobs: पोस्टात बिहार आणि महाराष्ट्रातनोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रासह दोन्ही राज्यांच्या सर्कलमध्ये 27 एप्रिल 2021 पासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी अद्याप ज्या उमेदवारांनी India Post GDS Recruitment 2021 साठी अर्ज केलेला नाहीय, त्यांनी http://appost.in/gdsonline/ वर जावून ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. (India Post Recruitment 2021, GDS Jobs in Maharashtra Circle on 2482 post)
दोन्ही राज्यांमध्ये एकूण 4368 ग्रामीण डाक सेवकांची (Gramin dak sevak)रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार खाली देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन भरतीची जाहिरात पाहू शकता.
महाराष्ट्रात किती जागा?
बिहार सर्कलमध्ये ग्रामीण पोस्टमनच्या 1940 जागा भरण्यात येणार आहेत. तर महाराष्ट्रात 2482 पदे भरली जाणार आहेत.
शिक्षणाची अट...
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची गणित, स्थानिक भाषेत आणि इंग्रजी विषय घेऊन 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कमीतकमी 60 दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स झालेला असणे बंधनकारक आहे.
वयाची अट
अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट ही कमीतकमी 18 ते अधिकाधिक 40 वर्षे वय असणे बंधनकारक आहे.
अर्ज शुल्क
ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस आदी कॅटेगरीसाठी उमेदवारांना 100 रुपयांचे अर्जशुल्क तर एससी, एसटी, महिला यांच्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
वेतन
ब्रांच पोस्टमास्टर (BPM) - टीआरसीए स्लॅबमध्ये 4 तास / स्तर 1 साठी कमीतकमी TRCA नुसार 12,000 रुपये, टीआरसीए स्लॅबमध्ये 5 तास / स्तर 2 मध्ये कमीतकमी TRCA नुसार 14,500 रुपये असणार आहे.
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) किंवा डाक सेवक - टीआरसीए स्लॅबमध्ये 4 तास / स्तर 1 साठी कमीतकमी TRCA नुसार 10,000 रुपये, टीआरसीए स्लॅबमध्ये 5 तास / स्तर 2 मध्ये कमीतकमी TRCA नुसार 12,000 रुपये पगार असणार आहे.
भरती कशी होणार
GDS पदांसाठी कोणतीही परिक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही १० वी मधील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. याशिवाय आरक्षणानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.
नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
https://appost.in/gdsonline/Home.aspx