पुणे : कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी बाजार समित्यांमार्फत २५ जानेवारीपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारण्यात आले. पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ ८ ते ९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा केले जाणार आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व काही खासगी बाजार समितीमध्ये १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांद्यांची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी येत्या १५ जानेवारीपर्यंत बाजार समित्यांमध्ये अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र,आवश्यक कागदपत्र जमा करण्यास वेळ लागत असल्याने पणन संचालक कार्यालयातर्फे २५ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली. १५ जानेवारीपर्यंत सुमारे सव्वालाख शेतक-यांचे अर्ज प्राप्त झाले होते. पुढील दोन ते तीन दिवसात २५ जानेवारीपर्यंत किती शेतक-यांनी अर्ज केले आहेत,याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये अनुदान अर्जासाठी स्वंतत्र कक्ष सुरू करण्यात आहेत.शासनातर्फे शेतकºयांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. पुणे जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) अनंत कटके म्हणाले,पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतक-यांनी या कालावधीत कांदा विक्री केली.काही शेतक-यांकडे कांदा विक्रीच्या दोन हे तीन पट्ट्या होत्या.मात्र,प्रत्येक शेक-याकडून केवळ एकच अर्ज स्वीकारला गेला.त्यातच कोल्हापूर, अहमदनगर, सातारा यांसह इतर जिल्हांमधील शेतक-यांनी सुध्दा पुण्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केली. मात्र,अनेक शेतक-यांनी अनुदानासाठी अर्ज केले नाहीत.शेतक-यांकडून अजूनही अर्ज स्वीकारले जात असून अर्ज स्वीककृतीसाठी शासनाकडून मुदत वाढून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.परंतु, २५जानेवारीपर्यंत पुण्यात अर्ज केलेल्या 8 ते 9 हजार शेतक-यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे.त्यासाठी ६ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव पणन संचालक कार्यालयास सादर केला आहे.----------------------शेतक-यांना २५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. पुढील दोन दिवसात राज्यातील एकूण किती शेतक-यांनी अनुदानासाठी अर्ज केले आहे,याबाबतची माहिती प्राप्त होईल. अर्ज केलेल्या शेतक-यांना पहिल्या टप्प्यात अनुदानाची रक्कम दिली जाईल.- दिपक तावरे,पणन संचालक
दर पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान फेब्रुवारीत मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 1:28 PM
येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा केले जाणार आहे.
ठळक मुद्देप्रति क्विंटल २०० रुपये : ८ ते ९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले ६ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव पणन संचालक कार्यालयास सादर