भरावामुळे नाल्याचे पाणी अंगणात
By admin | Published: August 3, 2016 03:26 AM2016-08-03T03:26:47+5:302016-08-03T03:26:47+5:30
मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली
चिकणघर : ढाबाचालकाने नाल्यात मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली होती. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
काटई गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा पारंपारिक नाला मातीचा भराव टाकून एका ढाबाचालकाने अडविला आहे. त्यामुळे अंगणात पाणी शिरल्याची तक्र ार अॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली होती. त्यावर आयुक्तांनी तक्र ार गांभीर्याने घेत केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अंगणात सतत पाणी साचत असल्याने साथीच्या रोगांच्या भिती असल्याचे चौधरी यांनी फडवणीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेने अजूनही लक्ष न दिल्यास उपोषण केले जाईल, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.
एकीकडे गावांचा केडीएमसी समावेशाला जोरदार विरोध असतानाही १ जून २०१५ च्या अधिसूचनेनूसार २७ गावांना केडीएमसीत समाविष्ट करण्यात आले. तर दुसरीकडे मात्र केडीएमसीचे अधिकारी आणी कर्मचाऱ्यांचे समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे संघर्ष समितीही गांभीर्याने पाहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका पूजा पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
>पालिकेतील समावेशाला गावांचा विरोध असतानाही त्यांचा समावेश जाला. त्यानंतरही साध्या-साध्या समस्यांकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीच ही गावे पालिकेतून पुन्हा वेगळी करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
>केडीएमसीने अॅड. सुनील चौधरी यांच्या तक्र ारीची गंभीर दखल घेतली आहे. दोन दिवसांत समस्या दूर केली जाईल.
- प्रभाकर पवार,
ई प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी.