पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम सत्र / वषार्तील पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून विद्यार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने सुद्धा परीक्षा देता येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना येत्या १३ सप्टेंबरपर्यंत आपल्या लॉगइन आयडीतून विकल्प अर्ज भरता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व राज्य शासनाने दिलेल्या निदेर्शानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित व अनुशेषांतर्गत लेखी परीक्षा, तसेच प्रात्यक्षित/मौखिक/प्रकल्प/चर्चासत्रे या परीक्षांच्या आयोजनाबाबत विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी मान्यता दिलेली आहे. अधिकार मंडळांच्या मार्गदर्शक तत्वानुसार अंतिम सत्राच्या व अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन विद्यापीठातर्फे केले जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देशभरातील व परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा मोठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अंतिम वर्षातील परीक्षांसाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाने ऑनलाइन पध्दतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लाँगिन आयडीवर विकल्प अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला असून विद्यार्थ्यांना बाबत काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, परीक्षा अधिकारी/ विषय शिक्षक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. ------------------विद्यार्थ्यांना परीक्षांबाबतचा विकल्प अर्ज http://sps.unipune.ac.in/लिंकवर उपलब्ध होईल--------------------------- विद्यार्थ्यांना आपल्या लॉगइन आयडीतून विकल्प अर्ज भरता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता धोक्यात न घालता पालकांच्या सहकार्याने विकल्प अर्ज भरावा. तसेच विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या आॅनलाइन पध्दतीने परीक्षा देण्याचा अवलंब करावा.- डॉ.महेश काकडे ,संचालक ,परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा विकल्प अर्ज उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 8:59 PM
१३ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदत
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देशभरातील व परदेशातील विद्यार्थी घेत आहेत शिक्षणपुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा मोठी