खासगी सावकारांकडील कर्जही माफ करा : पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:03 AM2020-03-04T05:03:52+5:302020-03-04T05:04:04+5:30
खासगी सावकारी जाचामुळे त्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ महाविकास आघाडी सरकारने द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत केली.
मुंबई : खासगी सावकारी जाचामुळे त्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ महाविकास आघाडी सरकारने द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत केली. तसेच, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यावरील हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.
पाटील म्हणाले की, सरकारने कर्जमाफी जाहीर करुनही, खासगी सावकरीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील म्हात्रे वाडीतील एका शेतकºयाने खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे अशा त्रस्त शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या सरकारने खासगी सावकारीमुळे त्रस्त शेतकºयांनाही कर्जमाफीचा लाभ दिला होता, याची आठवणही करुन दिली. त्याचप्रमाणे डॉ. कराड यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.