विद्यापीठावर चार कोटींचे ओझे

By admin | Published: August 13, 2014 12:44 AM2014-08-13T00:44:20+5:302014-08-13T00:44:20+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित ६,६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या

Four crores of burden on the university | विद्यापीठावर चार कोटींचे ओझे

विद्यापीठावर चार कोटींचे ओझे

Next

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित ६,६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यापीठाला ४ कोटी रुपयांचे ओझे सहन करावे लागणार आहे. यात प्रश्नपत्रिकेच्या ‘मॉडरेशन’पासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतचा खर्च समाविष्ट आहे.
विद्वत परिषदेने विशेष परीक्षेसंबंधी अध्यादेशाच्या प्रारूपाला मान्यता दिल्यानंतरच परीक्षा विभागाने परीक्षेची तयारी सुरू केली होती. विद्यार्थ्यांची संख्या पाहता नागपुरातच या विद्यार्थ्यांचे केंद्र असावे यादृष्टीने विद्यापीठाचा प्रयत्न सुरू आहे. विद्यापीठाने अधिसूचना काढून विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरावे, असे स्पष्ट केले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांकडून नामांकन नोंदणीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अंतर्गत मूल्यांकनाचे गुण देणार कोण?
दरम्यान, विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी तयारी तर केली आहे.
परंतु या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि प्रात्यक्षिकांचे गुण कोण देणार याबद्दल प्रश्न कायम आहे. ११७ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसारखेच या विद्यार्थ्यांच्या गुणांवर भविष्यात शंका उपस्थित व्हायला नको, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Four crores of burden on the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.