एक्स्प्रेस वेवरील अपघातात ४ ठार

By admin | Published: December 28, 2016 04:44 AM2016-12-28T04:44:16+5:302016-12-28T04:44:16+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फुडमॉल ते खोपोली एक्झिटदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने दोन ट्रेलर, एक टेम्पो व एक इको कार यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात चार जण

Four killed in accident in Expressway | एक्स्प्रेस वेवरील अपघातात ४ ठार

एक्स्प्रेस वेवरील अपघातात ४ ठार

Next

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फुडमॉल ते खोपोली एक्झिटदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने दोन ट्रेलर, एक टेम्पो व एक इको कार यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात चार जण ठार झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक निकामी झाल्यामुळे, तो एका टेम्पोवर आदळला आणि पुढे जाऊन उलटून दुसऱ्या एका ट्रेलरला धडक दिली. या
वेळी जवळून जात असलेली इको कार
याखाली सापडली. या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक तीन ते चार तास बंद होती. खोपोली एक्झिटवरून ही वाहतूक वळविण्यात
आली होती. (वार्ताहर)

- अपघातातील मृतांमध्ये ट्रेलरचालक नंदकिशोर माली (४२, रा. राजस्थान) यांच्यासह इको कारमधील बाळासाहेब शिंदे (४०, रा. फलटण, जि. सातारा), संंजय पवार (४०, रा. घणसोली, नवी मुंबई) आणि राजेंद्र पाटणकर (४१, रा. सावर्डे, जि. रत्नागिरी) यांचा समावेश आहे.

- अपघातामुळे वाहनांच्या ४ ते ५ किमीच्या रांगा लागलेल्या होत्या. आयआरबीची यंत्रणा आणि
पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Four killed in accident in Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.