किमान तापमान वाढल्याने कडाक्याच्या थंडीतून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 02:55 AM2017-12-19T02:55:01+5:302017-12-19T02:55:20+5:30
राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमान वाढल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान उस्मानाबाद येथे ११ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
पुणे : राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमान वाढल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान उस्मानाबाद येथे ११ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातील किमान तापमानात वाढ झाली आहे. बहुतांश भागात सकाळी धुके पडते. मुंबईसह काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. प्रमुख शहरातील किमान तापमान : पुणे १४़३, अहमदनगर १२़२, जळगाव १५़२, कोल्हापूर १६़८, महाबळेश्वर १३़३, मालेगाव १५़५, नाशिक १२़७, सांगली १६़२, सातारा १६़४, सोलापूर १३़२, मुंबई २२़५, अलिबाग २०़४, रत्नागिरी २३़२, भिरा २१़६, औरंगाबाद १६, परभणी १५़६, नागपूर ११़२.