पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) गेल्या नऊ वर्षांमध्ये क्विंटलमागे १३६ रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच दरवर्षी प्रतिक्विंटलमागे सरासरी १५ रुपयांची वाढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. दुसरीकडे साखरेचे प्रतिक्विंटलचे दर तीन ते साडेतीन हजार रुपयांवर स्थिर आहेत. सरकारदेखील साखरेचे भाव वाढून देण्यास तयार नसल्याने उपपदार्थ आणि आर्थिक नियोजनाद्वारेच एफआरपीचा भाव अवलंबून राहणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना गाळप हंगामात नक्की किती रक्कम मिळणार हे एफआरपीच्या दरावरुन निश्चित होते. त्यामुळे दरवर्षी एफआरपी या विषयावरुन सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये संघर्ष होतो. कधी जाहीर केल्या प्रमाणे एफआरपी दिली नाही म्हणून, तर कधी एफआरपी थकविली म्हणूनही आंदोलन आणि संघर्ष होत असतो. या गाळप हंगामापासून प्रथमच एफआरपी ठरविण्याच्या मूळ टक्केवारीत साडेनऊ वरुन १० टक्के असा बदल केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तेराशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर एफआरपीच्या दराचा आढावा घेतला असता दरवर्षी त्यात दीड ते पावणेदोन टक्क्यांच्या सरासरीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात २०१०-११ च्या गाळप हंगामामध्ये साडेनऊ टक्के साखर उताऱ्यासाठी १३९.१२ रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत होता. त्यात २०१७-१८च्या गाळप हंगामापर्यंत २५५ रुपये अशी वाढ झाली. म्हणजेच ८ वर्षांत ११५.८८ रुपयांनी एफआरपी वाढली. यंदाच्या गाळप हंगामासाठी (२०१८-१९) एफआरपीचा मूळ रेट १० टक्के करण्यात आला असून, एफआरपी २७५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. म्हणजेच १० टक्के साखर उताऱ्यासाठी (१ टन ऊस गाळपातून तयार होणारे साखरेचे प्रमाण) हा दर लागू असेल. गेल्या ९ वर्षांत २०१६-१७च्या गाळप हंगामात एफआरपीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्यावेळी राज्यात सर्वात नीचांकी ४२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कमी उत्पादनामुळे साखरेला नऊ वर्षांतील उच्चांकी प्रतिक्विंटल ३५०० रुपये इतका दर मिळाला होता. ------------------------साखर हंगाम वर्ष एफअरपी दर (प्रतिक्विंटल) डिसेंबर महिन्यातील साखरेचा दर (प्रतिक्विंटल) साखर उत्पादन(लाखटन)२०१०-११ १३९.१२ ३००० ९०२०११-१२ १४५ ३०५० ८९२०१२-१३ १७० ३४०० ७९२०१३-१४ २१० २७५० ७७२०१४-१५ २२० २६५० १०५ २०१५-१६ २३० २७०० ८४२०१६-१७ २३० ३५०० ४२२०१७-१८ २५५ ३४५० १०५२०१८-१९ २७५ ३२०० ..... --
एफआरपीच्या दरात दरवर्षी पंधरा रुपयांनी होतेय वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 7:00 AM
शेतकऱ्यांना गाळप हंगामात नक्की किती रक्कम मिळणार हे एफआरपीच्या दरावरुन निश्चित होते.
ठळक मुद्देराज्यातील स्थिती : नऊ वर्षांत अवघी १३६ रुपयांनी वाढले दरदरवर्षी एफआरपी या विषयावरुन सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये संघर्षया गाळप हंगामापासून प्रथमच एफआरपी ठरविण्याच्या मूळ टक्केवारीत बदल