देशात जानेवारी अखेरपर्यंत २० हजार कोटींची एफआरपी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 10:00 PM2019-02-04T22:00:56+5:302019-02-04T22:05:02+5:30

साखर आयुक्तालयाने ३९ साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) बजावले.  

FRP of Rs 20,000 crores was exhausted of January end | देशात जानेवारी अखेरपर्यंत २० हजार कोटींची एफआरपी थकीत

देशात जानेवारी अखेरपर्यंत २० हजार कोटींची एफआरपी थकीत

Next
ठळक मुद्देसाखरेचे उत्पादन पोहोचले १८५ लाख टनांवर

पुणे : देशात जानेवारी अखेरीस ५१४ साखर कारखान्यांमधून १८५.१९ लाख टन साखर उत्पादित झाली असून, गेल्या वषीर्पेक्षा १४ लाख टन साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. उसाची रास्त आणि किफायतशीर (एफआरपी) दराची देशपातळीवर तब्बल २० हजार कोटी रुपयांची रक्कम जानेवारी अखेरीस थकीत असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून (इस्मा) देण्यात आली. 
ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. राज्यात १५ जानेवारी अखेरीस ५ हजार ३२० कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी होती. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एफआरपीसाठी आंदोलन सुरु केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २७ जानेवारीला साखर आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलनही केले. त्यानंतर साखर आयुक्तालयाने ३९ साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावले.  राज्यात १५ जानेवारी अखेरच्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस सुरु असलेल्या १९० साखर कारखान्यांकडे १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये शेतकºयांना देण्यात आले आहेत. शेतकºयांनी केलेल्या आंदोलनानंतर कारखान्यांनी ३ हजार २९७ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.  
दरम्यान,राज्यात १९१ साखर कारखान्यांमधून १ फेब्रुवारी अखेरीस ६६१.१८ लाख टन ऊस गाळपातून, ७१ लाख टन साखर उत्पादित झाली. उत्तर प्रदेशात ११७ साखर कारखान्यांमधून ५३.३६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात ११९ कारखान्यांमधून ५३.९८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या सरासरी उताºयात ०.८१ टक्के वाढ झाल्याने उत्तरप्रदेशाने गेल्यावषीर्ची उत्पन्नाची सरासरी गाठली आहे. 
कर्नाटकमध्ये ६५ कारखान्यांनी ३३.४०, तमिळनाडूतील २९ कारखान्यांनी ३.१०, गुजरामतमधील १६ कारखान्यांनी ६.५० आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील २४ साखर कारखान्यांनी ३.७० लाख टन साखरेचे उत्पादन जानेवारी अखेरीस घेतले आहे. बिहारमधे ४.०८, उत्तराखंड १.७५, पंजाब २.९०, हरयाणा २.९०, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील कारखान्यांमधून २.६० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 
---
साखरेची किमान किंमत हवी ३५ ते ३६ रुपये किलो
साखरेची किमान आधारभूत किंमत २९०० रुपये प्रतिक्विंटल आहे. कारखान्यांमध्ये सध्या २९ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने साखरेची विक्री सुरु आहे. साखरेच्या उत्पादन खचार्पेक्षा हा दर ५ ते सहा रुपये प्रतिकिलोने कमी आहे. त्यामुळे साखरेची किमान आधारभूत किंमत ३५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल (३५ ते ३६ रुपये किलो ) केली पाहिजे. तरच, शेतकºयांची उसाची देणी कारखान्यांना देता येईल, असे इस्माचे म्हणणे आहे. 

Web Title: FRP of Rs 20,000 crores was exhausted of January end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.