गडकरी यांची शिष्टाई असफल
By admin | Published: March 2, 2015 02:48 AM2015-03-02T02:48:45+5:302015-03-02T02:48:45+5:30
भूसंपादन विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा द्यावा याकरिता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलेली शिष्टाई सपशेल असफल ठरली आहे. परिणामी, भूसंपादन विधेयकातील काही तरतुदींना असलेला शिवसेनेचा
मुंबई : भूसंपादन विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा द्यावा याकरिता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलेली शिष्टाई सपशेल असफल ठरली आहे. परिणामी, भूसंपादन विधेयकातील काही तरतुदींना असलेला शिवसेनेचा विरोध कायम आहे. या तरतुदींसह हे विधेयक मंजूर होता कामा नये, असे लेखी
निवेदन सेना केंद्र सरकारला देणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले आहे.
भूसंपादन विधेयकातील बळजबरीने जमीन संपादित करणे, लोकांच्या सहमतीची गरज नसणे आणि सिंचनाखालील सुपीक जमीन संपादित करण्यास परवानगी असणे यांसारख्या तरतुदींना शिवसेनेने विरोध केला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी
ठाकरे-गडकरी भेटीतून काही निष्पन्न झालेले नाही, असे स्पष्ट केले. भूसंपादन विधेयक मांडण्यापूर्वी भाजपाने शिवसेनेबरोबर चर्चा का केली नाही,
असा सवाल करून देसाई म्हणाले की, तसे केले असते तर या विधेयकाला शिवसेनेचा असलेला आक्षेप अगोदर कळला असता.
शिवसेना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देऊ शकत नाही. शिवसेना आपल्या आक्षेपांबाबत लेखी निवेदन केंद्र सरकारला देणार असून, विधेयकातील कुठले जाचक मुद्दे मंजूर होता कामा नयेत ते सरकारच्या लक्षात आणून देणार आहे.