ग्रामीण भागात प्रभावी आरोग्यसेवा मिळावी

By admin | Published: August 13, 2014 12:50 AM2014-08-13T00:50:34+5:302014-08-13T00:50:34+5:30

ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचे त्यांच्या आरोग्याकडे सदैव दुर्लक्ष होत असते. शिवाय, ग्रामीण व दुर्गम भागात आजही प्रभावी आरोग्यसेवा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली

Get effective healthcare in rural areas | ग्रामीण भागात प्रभावी आरोग्यसेवा मिळावी

ग्रामीण भागात प्रभावी आरोग्यसेवा मिळावी

Next

अमोल देशमुख : हर्ड फाऊंडेशनच्यावतीने कन्हान येथे आरोग्य शिबिर
पारशिवनी : ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचे त्यांच्या आरोग्याकडे सदैव दुर्लक्ष होत असते. शिवाय, ग्रामीण व दुर्गम भागात आजही प्रभावी आरोग्यसेवा नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी, असे प्रतिपादन हर्ड फाऊंडेशनचे प्रबंध संचालक डॉ. अमोल देशमुख यांनी केले.
कन्हान येथे हर्ड फाऊंडेशनच्यावतीने आरोग्य जनजागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समिती सदस्य राजेश यादव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून इंदरसिंंग जम्बे, यादवराव कुंभलकर, संजय महल्ले, रंगराव ठाकरे, एकनाथ महल्ले, नारायण ठाकरे आदी उपस्थित होते.
डॉ. अमोल देशमुख हे ग्रामीण भागातील गरीब व दुर्लक्षित नागरिकांपर्यंत प्रभावी आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात, असे प्रतिपादन राजेश यादव यांनी केले. या शिबिरात दोन हजार नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून, औषधोपचारही करण्यात आले. रुग्णांनी आरोग्य तपासणी करून संदर्भित सेवेचा लाभ घेतला. या शिबिरात एन.के.पी.साळवे वैद्यकीय महाविद्यालय, लता मंगेशकर हॉस्पिटल, औषधीशास्त्र महाविद्यालय येथील मेडिसीन, सर्जरी, अस्थिरोग विभाग, नेत्र तपासणी, त्वचा, कान-नाक-घसा, क्षयरोग, छातीचे रोग, बालरोग, स्त्रीरोग, भौतिकोपचार, दंतरोग आदी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा प्रदान केली.
यावेळी कन्हान, कांद्री, गोंडेगाव-टेकाडी, खेडी-खोपडी, वराडा, सत्रापूर, वाघोली, साटक, डुमरी (खुर्द), डुमरी (रेल्वे), बनपुरी, घाटरोहणा, जुनी कामठी येथील दोन हजार रुग्णांची विनामूल्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. नर्सिंग कॉलेजसह २०० कर्मचारी शिबिरात सहभागी झाले होते.
डोळे, शारीरिक व्याधी रोग, सांधेदुखी, दंतरोग, कुपोषित बालक, चर्मरोग, कमी ऐकू येणे यासह अन्य व्याधींवर उपचार करण्यात आले. यातील एकूण १३९ रुग्णांना संदर्भसेवा म्हणून नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घेण्यास शिफारसपत्र दिले. याशिवाय ५२ रुग्णांची मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. ६२ रुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले. ८१ रुग्णांची शर्करा तपासणी, ७२ रुग्णांची इलेक्ट्रोपॅथी, आठ रुग्णांवर सामान्य शस्त्रक्रिया, सात रुग्णांच्या दंत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी माजी सभापती देवीदास जामदार, डॉ. वर्मा, मिलिंंद वाघधरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी भेटी देऊन हर्ड फाऊंडेशनची प्रशंसा केली. (तालुका वार्ताहर)

Web Title: Get effective healthcare in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.