फोन करून मिळवा आवडते खाद्यपदार्थ

By admin | Published: January 24, 2015 01:51 AM2015-01-24T01:51:15+5:302015-01-24T01:51:15+5:30

फोन करून जेवण उपलब्ध करण्याची सोय प्रवाशांसाठी लवकरच केली जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांकडून नुकतेच सांगण्यात आले होते.

Get By Phone Favorite Foods | फोन करून मिळवा आवडते खाद्यपदार्थ

फोन करून मिळवा आवडते खाद्यपदार्थ

Next

मुंबई : फोन करून जेवण उपलब्ध करण्याची सोय प्रवाशांसाठी लवकरच केली जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांकडून नुकतेच सांगण्यात आले होते. ही सेवा आता आयआरसीटीसीमार्फत (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन) २५ ट्रेनमध्ये केली जात असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधून लांबचा प्रवास करताना प्रवाशांना आवडते खाद्यपदार्थांची चव चाखता यावी यासाठी रेल्वेकडून अशी सुविधा देण्याची चाचपणी सुरू होती. यासाठी काही कंत्राटदार तसेच हॉटेलशी बोलणीही सुरू होती. अशी सेवा लवकरच सुरू केली जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते. त्यानंतर या सेवेचा आयआरसीटीसीकडून २५ ट्रेनमध्ये शुभारंभ करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यासाठी १८00१0३४१३९ हा टोल फ्री नंबर उपलब्ध केला आहे. या नंबरवर प्रवाशांनी कॉल केल्यास रेल्वे प्रवासात पाहिजे त्या स्थानकादरम्यान प्रवाशांना तत्काळ आवडता खाद्यपदार्थ किंवा जेवण उपलब्ध केले जाईल, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे १३९ या नंबरवर एसएमएस करण्याची सोयही करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

अजमेर-जम्मू तावी एक्स्प्रेस, भोपाळ एक्स्प्रेस, इंदौर-देहराडून एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, गरीब रथ एक्स्प्रेस, चेरण एक्स्प्रेस, नागरकोईल एक्स्प्रेस, एलटीटी-कोच्चुवेल्ली गरीब रथ, चामुंडी एक्स्प्रेस, ६३१५ कोच्चुवेल्ली एक्स्प्रेस, हैदराबाद एक्स्प्रेस, विसखा एक्स्प्रेस, यशवंतपूर गरीब रथ एक्स्प्रेस, वांद्रा टर्मिनस-निजामुद्दीन गरीब रथ, गुहाहाटी गरीब रथ, मुंबई गरीब रथ एक्स्प्रेस, जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस, जयनगरी निजामुद्दीन गरीब रथ एक्स्प्रेस, गोरखधाम एक्स्प्रेस, वेंकटद्री एक्स्प्रेस, श्रवस्ती एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस, वांद्रा टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस, ईस्ट कोस्ट एक्स्प्रेस व पुरी एक्स्प्रेसमध्ये ही सेवा उपलब्ध असेल. मात्र यातील प्रत्यक्षात महाराष्ट्रातील एकाही ट्रेनचा समावेश करण्यात आलेला नसून ठेंगाच दाखविण्यात आला आहे.

Web Title: Get By Phone Favorite Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.