शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

फोन करून मिळवा आवडते खाद्यपदार्थ

By admin | Published: January 24, 2015 1:51 AM

फोन करून जेवण उपलब्ध करण्याची सोय प्रवाशांसाठी लवकरच केली जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांकडून नुकतेच सांगण्यात आले होते.

मुंबई : फोन करून जेवण उपलब्ध करण्याची सोय प्रवाशांसाठी लवकरच केली जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांकडून नुकतेच सांगण्यात आले होते. ही सेवा आता आयआरसीटीसीमार्फत (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन) २५ ट्रेनमध्ये केली जात असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधून लांबचा प्रवास करताना प्रवाशांना आवडते खाद्यपदार्थांची चव चाखता यावी यासाठी रेल्वेकडून अशी सुविधा देण्याची चाचपणी सुरू होती. यासाठी काही कंत्राटदार तसेच हॉटेलशी बोलणीही सुरू होती. अशी सेवा लवकरच सुरू केली जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते. त्यानंतर या सेवेचा आयआरसीटीसीकडून २५ ट्रेनमध्ये शुभारंभ करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यासाठी १८00१0३४१३९ हा टोल फ्री नंबर उपलब्ध केला आहे. या नंबरवर प्रवाशांनी कॉल केल्यास रेल्वे प्रवासात पाहिजे त्या स्थानकादरम्यान प्रवाशांना तत्काळ आवडता खाद्यपदार्थ किंवा जेवण उपलब्ध केले जाईल, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे १३९ या नंबरवर एसएमएस करण्याची सोयही करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अजमेर-जम्मू तावी एक्स्प्रेस, भोपाळ एक्स्प्रेस, इंदौर-देहराडून एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, गरीब रथ एक्स्प्रेस, चेरण एक्स्प्रेस, नागरकोईल एक्स्प्रेस, एलटीटी-कोच्चुवेल्ली गरीब रथ, चामुंडी एक्स्प्रेस, ६३१५ कोच्चुवेल्ली एक्स्प्रेस, हैदराबाद एक्स्प्रेस, विसखा एक्स्प्रेस, यशवंतपूर गरीब रथ एक्स्प्रेस, वांद्रा टर्मिनस-निजामुद्दीन गरीब रथ, गुहाहाटी गरीब रथ, मुंबई गरीब रथ एक्स्प्रेस, जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस, जयनगरी निजामुद्दीन गरीब रथ एक्स्प्रेस, गोरखधाम एक्स्प्रेस, वेंकटद्री एक्स्प्रेस, श्रवस्ती एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस, वांद्रा टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस, ईस्ट कोस्ट एक्स्प्रेस व पुरी एक्स्प्रेसमध्ये ही सेवा उपलब्ध असेल. मात्र यातील प्रत्यक्षात महाराष्ट्रातील एकाही ट्रेनचा समावेश करण्यात आलेला नसून ठेंगाच दाखविण्यात आला आहे.