वाडा येथे मुलीवर सामूहिक बलात्कार
By admin | Published: March 6, 2017 05:25 AM2017-03-06T05:25:08+5:302017-03-06T05:25:08+5:30
तालुक्यातील मांडा गावात हळदी समारंभात आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास सामूहिक बलात्कार झाला.
वाडा: तालुक्यातील मांडा गावात हळदी समारंभात आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणी तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.
या समारंभात गावातील नववीत शिकणारी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मित्रासोबत गप्पा करीत बसलेली असताना पहाटे ३ च्या सुमारास पिंट्या उर्फ रमेश सुभाष पाडोसा (वय २५ रा.मांडा), सुनिल दामू उंबरसडा (वय २४, रा.खरीवली) व समीर पंढरीनाथ अधिकारी (वय ३०, रा.खरीवली) या तिघांनी संगनमत करून मुलीसोबत असणाऱ्याला मारहाण केली व तिला शेतात नेऊन बलात्कार केला.
घडलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितल्यावर तिने पोलिसांत धाव घेतली. पोलीसांनी आरोपींविरोधात विविध गुन्हे
दाखल करीत तात्काळ तिघा आरोपींना अटक केली आहे. (प्रतिनिधी)