वाडा: तालुक्यातील मांडा गावात हळदी समारंभात आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर रविवारी पहाटे ३ च्या सुमारास सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणी तिघांना पोलीसांनी अटक केली आहे.या समारंभात गावातील नववीत शिकणारी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मित्रासोबत गप्पा करीत बसलेली असताना पहाटे ३ च्या सुमारास पिंट्या उर्फ रमेश सुभाष पाडोसा (वय २५ रा.मांडा), सुनिल दामू उंबरसडा (वय २४, रा.खरीवली) व समीर पंढरीनाथ अधिकारी (वय ३०, रा.खरीवली) या तिघांनी संगनमत करून मुलीसोबत असणाऱ्याला मारहाण केली व तिला शेतात नेऊन बलात्कार केला.घडलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितल्यावर तिने पोलिसांत धाव घेतली. पोलीसांनी आरोपींविरोधात विविध गुन्हे दाखल करीत तात्काळ तिघा आरोपींना अटक केली आहे. (प्रतिनिधी)
वाडा येथे मुलीवर सामूहिक बलात्कार
By admin | Published: March 06, 2017 5:25 AM