आरोग्य केंद्रातून दर्जेदार सुविधा

By admin | Published: May 19, 2016 01:37 AM2016-05-19T01:37:36+5:302016-05-19T01:37:36+5:30

सध्या नागरिकांमध्ये संकरित खानपानाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत.

Good quality from health center | आरोग्य केंद्रातून दर्जेदार सुविधा

आरोग्य केंद्रातून दर्जेदार सुविधा

Next


धनकवडी : सध्या नागरिकांमध्ये संकरित खानपानाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत. मनपाच्या आरोग्य केंद्रातील दर्जेदार सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे जास्तीत जास्त नागरिक उपचार घेत आहेत. भविष्यातदेखील चांगल्या सोई-सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.
धनकवडी येथील महापालिकेच्या विलासराव तांबे आरोग्य केंद्राचे नूतनीकरण व नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या दंतचिकित्सा केंद्राचे बुधवारी जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, बापूसाहेब धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, नगरसेवक अप्पा रेणुसे, वसंत मोरे, मोहिनी देवकर, कल्पना थोरवे, वर्षा तापकीर, भारती कदम, सुवर्णा पायगुडे, संतोष फरांदे, सर्जेराव शिळमकर, बाळासाहेब धनकवडे, उदय जगताप, आरोग्य केंद्राचे डॉ. अमोल खडके आदी उपस्थित होते. विशाल तांबे म्हणाले, ‘‘या रुग्णालयातून आतापर्यंत ९० हजारांवर नागरिकांनी औषधोपचार घेतले आहेत. आज १५ लाख रुपये खर्च करून दंतचिकित्सा विभाग सुरू करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Good quality from health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.