Maharashtra Government : ही तर उधारीतील कर्जमाफी,सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 05:38 PM2019-12-21T17:38:43+5:302019-12-21T17:38:51+5:30
Maharashtra Government : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्र सोडले.
नागपूर - राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. मार्च महिन्यात होणारी ही कर्जमाफी ही उधारीतील कर्जमाफी आहे. सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवून सरकारने राज्यातील सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्र सोडले. ''या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिलेला नाही. शेतकऱ्यांना राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी केलेल्या घोषणे प्रमाणे हेक्टरी ८ हजार रुपयेच मिळणार आहेत. मात्र त्यात सरकारने काहीही वाढ केलेली नाही. सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या आश्वासनावरूनही शब्द सरकारने शब्द फिरवला आहे. मार्च महिन्यात होणारी ही कर्जमाफी ही उधारीतील कर्जमाफी आहे. सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवून सरकारने राज्यातील सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे,'' असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Press conference as the Maharashtra Winter Assembly Session concludes in Nagpur #WinterSessionhttps://t.co/3xNl1ssvZr
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 21, 2019
राज्य सरकार सप्टेंबर २०१९ पर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. मात्र यामध्ये सगळ्या प्रकारचे कर्ज आहे का? आम्ही पिक कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज माफ केले होते. आता या कर्जमाफीमधून नेमका किती शेतकऱ्यांना हा फायदा होणार आहे, हा प्रश्नच आहे, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.