औरंगाबाद विमानतळाचे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' करण्यास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 08:11 PM2020-03-05T20:11:24+5:302020-03-05T20:16:36+5:30
याआधी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे.
औरंगाबादविमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील “ धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ” असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल.
औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्यात आले. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतल्याबद्दल मुखमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे @OfficeofUT, मंत्रिमंडळाचे आभार! महाराष्ट्रातील तमाम जनतेला दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्यास महाविकास आघाडी सरकार कायम वचनबद्ध!
— Subhash Desai (@Subhash_Desai) March 5, 2020
यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.