बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, 300 कोटी...; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 01:46 PM2024-02-22T13:46:34+5:302024-02-22T13:47:07+5:30

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अजय बारसकर महाराज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Govt suppresses Ajay Baraskar's rape case, 300 crores...; Serious allegations of Manoj Jarange patil | बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, 300 कोटी...; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, 300 कोटी...; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

२४ तारखेपासून सलग रास्तारोको आंदोलन करण्याची घोषणा करणाऱ्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अजय बारसकर महाराज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजय बारसकर हा महाराज वगैरे नाही. त्याच्या गावातील लोक बारसकर याने महिलांवर बलात्कार केल्याचे सांगतात. एका बलात्काराच्या प्रकरणात तो अडकला होता, ते प्रकरण सरकारकडून दाबले गेल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. 

आता हेच प्रकरण काढत बारसकर याला माझ्याविरोधात बोलण्याची धमकी दिली गेली आहे. तू जरांगेंविरोधात बोल नाहीतर तुझं प्रकरण उघड करु, अशी धमकी दिली गेल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. अंतरवाली येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अजय बारसकर बच्चू कडू यांच्यासोबत यायचा. त्याला विकत घेतले गेले आहे. अनेक भानगडी केल्या आहेत. त्याने एका संस्थानाच्या नावाखाली लोकांकडून ३०० कोटी जमा केले होते. दुसऱ्या गावात भिशीचे पैसे घेऊन तो पळाला होता. आता तो मरणार आहे. फक्त त्याला तुकाराम महाराजांचे नावाखाली सहानुभूती घेऊन मरायचे आहे, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. 

मी उपोषणाला बसलो होतो तेव्हा मी माझ्या तंद्रीत होतो. तेव्हा चिडचिड होत होती, त्यात मी काही बोलून गेलो असेन तर तुकाराम महाराजांसमोर नाक घासायला तयार आहे. आंदोलन संपल्यानंतर त्याचा पश्चाताप करेन. सरकार, शिंदे साहेबांचा प्रवक्ता आणि बारसकरच्या पाठी जो कोणी बडा नेता आहे, त्याने बारसकरची साछ दिली तर तुमच्या पक्षाचे वाटोळे होईल, असा इशारा बारसकर यांनी दिला आहे. 

Web Title: Govt suppresses Ajay Baraskar's rape case, 300 crores...; Serious allegations of Manoj Jarange patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.