राज्यभरातून ‘माळढोक’ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:54 AM2017-10-03T03:54:28+5:302017-10-03T03:54:32+5:30
भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून व महाराष्ट्र वन्यजीव विभागाच्या वतीने माळढोक व अन्य पक्ष्यांच्या राज्यभरात केलेल्या सहा दिवसांच्या विशेष सर्वेक्षणात एकही माळढोक पक्षी आढळला नाही.
अरुण बारसकर
सोलापूर : भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून व महाराष्ट्र वन्यजीव विभागाच्या वतीने माळढोक व अन्य पक्ष्यांच्या राज्यभरात केलेल्या सहा दिवसांच्या विशेष सर्वेक्षणात एकही माळढोक पक्षी आढळला नाही. पक्षी गणनेची ही मोहीम २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान ३१ पथकांद्वारे राबविण्यात आली, अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम असल्याचे सांगण्यात आले.
माळढोकसोबत हरीण, काळवीट, खोकड, लांडगा, ससा, चिंकारा व अन्य वन्यजीवांचीही गणना करण्यात आली. माळढोक पक्ष्याचा वावर असणाºया राज्यभरातील १५-१६ जिल्ह्णात हे विशेष सर्वेक्षण करण्यात आले. आतापर्यंत नान्नज, गंगेवाडी (सोलापूर), वरोरा (चंद्रपूर), नाशिक परिसर, लातूर जिल्ह्णाच्या काही भागांत माळढोक पक्षी आढळला होता.
आज जरी माळढोक पक्षी आढळला नसला, तरी कोणत्या भागात पक्षी वावरतो हे विशेष सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणात पक्षी दिसला नाही म्हणजे माळढोक नाही असे नाही. झाडाझुडपातील पक्षी दिसला नाही, असेही झाले असू शकते.
के. टी. सिंग, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग, पुणे
सोलापूर जिल्ह्णातील तसेच उस्मानाबाद जिल्ह्णातील लगतच्या भागातील माळढोक व वन्यजीव पक्षांच्या सर्वेक्षणाचे काम १० पथकांनी केले. जिल्हाभरात एकही माळढोक पक्षी आढळला नाही. अन्य वन्यजीव प्राणी-पक्षीही कमीच दिसून आले; मात्र १३ आॅगस्ट रोजी नान्नजला माळढोक दिसला होता.
- शाहीर खान, शोधकर्ता,
भारतीय वन्यजीव संस्था