चिक्की घोटाळ्याच्या आरोपामागे गुजराती लॉबी
By Admin | Published: June 29, 2015 12:38 AM2015-06-29T00:38:25+5:302015-06-29T00:38:25+5:30
- सूर्यकांता संस्थेने सर्व आरोप फेटाळले
- ूर्यकांता संस्थेने सर्व आरोप फेटाळलेवेंगुर्ले (जि. रत्नागिरी) : संपूर्ण राज्यात चिक्की घोटाळ्यावरून रान पेटले असतानाच सरकारला चिक्की पुरवणार्या सूर्यकांता महिला सहकारी संस्थेने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. यामागे गुजराती उद्योगपतीची लॉबी काम करीत असून, आरोपामागे त्यांचाच हात असल्याचा दावा संस्थेने केला आहे.महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप होत आहे. सूर्यकांता महिला सहकारी संस्थेला मिळालेल्या ८० कोटी रुपयांची चिक्की पुरविण्याच्या ठेक्यावरून ही संस्था देखील संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर वेतोर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सूर्यकांता महिला सहकारी संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे यांनी हा दावा केला.सन २००५मध्ये स्थापन झालेली सूर्यकांता महिला सहकारी संस्था २००८मध्ये रजिस्टर करून २०१०मध्ये तिचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर २०११मध्ये चिक्की बनविण्यास मान्यता मिळाली. २०१३मध्ये चिक्की पुरवण्याची पहिली ऑर्डर मिळाली. आमची संस्था एकमेव खासगी सहकारी संस्था असून, सध्या वेतोरे येथील युनिटकडून २०० टन चिक्कीचे उत्पादन सुरू असल्याची माहिती गावडे यांनी दिली. आम्हाला मिळालेली ऑर्डर ८० कोटींची नसून, ती ७४ कोटींची होती. त्यामध्ये ५२ कोटी मायक्रो न्युट्रियन्ट व २२ कोटी राजगिरा चिक्कीची ऑर्डर होती. चिकीसाठी लागणारा शेंगदाणा, गूळ आदी उच्च दर्जाचे वापरत आहोत. २०१३ मध्ये झालेली राजकीय तक्रार वगळता एकही तक्रार आमच्या चिक्की उत्पादनाबाबत नाही, असे गावडे म्हणाले. (प्रतिनिधी)