बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लोकमतकडून शुभेच्छा
By Admin | Published: February 28, 2017 09:40 AM2017-02-28T09:40:25+5:302017-02-28T12:41:06+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लोकमतकडून खूप खूप शुभेच्छा. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले आहेत.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. यंदा परीक्षेस १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यात ८ लाख ४८ हजार ९२९ विद्यार्थी आणि ६ लाख ५६ हजार ४३६ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अधिक संधी उपलब्ध झाल्याने ही वाढ झाली असावी, असा अंदाज राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. म्हमाणे म्हणाले, बारावीच्या परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘गैरमार्गाविरोधात लढा’ हे अभियान राबाविले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ७ याप्रमाणे सुमारे २५० भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
जळगाव : 75 टक्के अंधत्व असलेली दिव्यांग विद्यार्थिनी परीक्षा देतानाचे दृश्य (फोटो सुमित देशमुख)
ठाणे - पीपल्स एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये परीक्षेसाठी दाखल झालेले 12वीचे विद्यार्थी
अमरावती : श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात आपला परीक्षा वर्ग शोधताना विद्यार्थी