ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - बारावी बोर्डच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ऐनवेळी सेंटर बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. दादर येथील डॉ. अँटोनियो डी सिल्वा हायस्कूलमधील ही घटना आहे. शाळेने विद्यार्थ्यांचे सेंटरमध्ये ऐनवेळी बदल करत नाबर गुरूजी हायस्कूलमध्ये बैठक व्यवस्था केली.
ऐनवेळी बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) या चार विषयांच्या पेपरसाठी शाळेनं जवळपास 100 विद्यार्थ्यांच्या आसनव्यवस्था ऐनवेळी बदल केला.
विशेष म्हणजे केवळ दोन दिवसांपूर्वी शाळेने एक माहिती फलक लावून ही बाब स्पष्ट केली.
मात्र विद्यार्थी व पालकांना याची जराशीही कल्पना नसल्याने परीक्षेच्या पहिल्या दिवशीच गोंधळ उडाला. दरम्यान, या सर्व प्रकारावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.