आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा आता २ जूनपासून, ‘नीट पीजी’ परीक्षा पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 04:54 AM2021-04-16T04:54:11+5:302021-04-16T04:54:52+5:30

Health University exams : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार हिवाळी २०२० परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्यात १९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासह पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्यात  येणार होत्या.

The Health University exams have now been postponed from June 2, the 'Neat PG' exams | आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा आता २ जूनपासून, ‘नीट पीजी’ परीक्षा पुढे ढकलली

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा आता २ जूनपासून, ‘नीट पीजी’ परीक्षा पुढे ढकलली

Next

नाशिक : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, त्या २ जूनपासून सुरू होणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली. 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार हिवाळी २०२० परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्यात १९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासह पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्यात  येणार होत्या. या परीक्षा आता  २ जूनपासून सुरू होणार आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी २०२०च्या प्रथम वर्ष (२०१९ बॅच)  अभ्यासक्रमाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे माता, बाल आणि किशोरवयीन  कुटुंब कल्याण आरोग्य सेवांसदर्भातील अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ जूनला होणार आहे. तर वैद्यकीय, शल्यक्रिया आणि क्लिनिकल सेवांसदर्भातील परीक्षा ३ जूनला व  पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा परीक्षा २४ ते ३० जून या कालावधीत होणार आहे. सार्वजनिक स्वास्थ्य विषयांसंदर्भातील परीक्षा ४ जूनला होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली आहे.

‘नीट पीजी’ परीक्षा पुढे ढकलली
नवी दिल्ली : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारने १८ एप्रिलला हाेणारी ‘नीटपीजी-२०२१’ ही वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आराेग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी ट्विट करून ही माहिती दिली. परीक्षेची नवीन तारीख काही दिवसांनी कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: The Health University exams have now been postponed from June 2, the 'Neat PG' exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.