राज्यात उष्णतेची लाट कायम!
By admin | Published: May 22, 2015 01:24 AM2015-05-22T01:24:26+5:302015-05-22T01:24:26+5:30
कोकण वगळता संपूर्ण राज्यात गुरुवारी उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी या भागांतील जनजीवन ठप्प झाले होते़ पुढील २ दिवस तरी राज्यात अशीच स्थिती राहील,
पुणे/नागपूर : कोकण वगळता संपूर्ण राज्यात गुरुवारी उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी या भागांतील जनजीवन ठप्प झाले होते़ पुढील २ दिवस तरी राज्यात अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वाधिक ४७.५ अंश सेल्सिअस तापमान वर्ध्यात नोंदविले गेले. त्यापाठोपाठ नागपूरचे तापमान ४७ अंशावर होते. दरम्यान, उष्माघातामुळे भंडारा जिल्ह्यात दोघांचा, तर चंद्रपूरच्या घुग्घूस येथे युवकाचा मृत्यू झाला.
विदर्भातील उष्णतेची लाट कायम असून, गुरुवारचा दिवसदेखील नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारा ठरला. विदर्भातील जवळपास सर्वच शहरांत पाऱ्याने ४५ अंशांची पातळी ओलांडली. ‘मे हिट’च्या या जबरदस्त तडाख्याने रहिवासी अक्षरश: हैराण झाले आहेत.
दरम्यान, उष्माघातामुळे भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातील बसचालक विनोद गणपतराव ढवळे (४०) हे कर्तव्यावर असताना वाटेत त्यांना घाबरल्यासारखे वाटू लागले. त्यांना तातडीने सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर डोंगरगाव येथे अनोळखी वृद्धेचा बुधवारी उष्माघाताने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हे उघडकीस आले़