हॉस्पिटलच्या मालमत्तेवर टाच

By Admin | Published: September 10, 2016 01:35 AM2016-09-10T01:35:11+5:302016-09-10T01:35:11+5:30

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, तळेगाव व सोमाटणे फ ाटा परिसरातील खासगी हॉस्पिटलवर दोन दिवसांपासून धडक कारवाई सुरू केली.

The heels of the hospital's heels | हॉस्पिटलच्या मालमत्तेवर टाच

हॉस्पिटलच्या मालमत्तेवर टाच

googlenewsNext


पिंपरी : प्राप्तिकर विभागाने पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, तळेगाव व सोमाटणे फ ाटा परिसरातील खासगी हॉस्पिटलवर दोन दिवसांपासून धडक कारवाई सुरू केली. या वेळी कोट्यवधी रुपयांच्या अघोषित मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली आहेत. संबंधित हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी करून अघोषित मालमत्तेवर टाच आणली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्यातील अनेक खासगी हॉस्पिटलनी आपले उत्पन्न प्राप्तिकर विभागाला सादर केलेले नाही. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या निगडी कार्यालयाने धडक कारवाई सुरू केली आहे. करदात्यांना एकाच वेळी कर जमा करता येत नाही. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने तीन टप्प्यांत कर भरता यावा, यासाठी कर प्रकटीकरण योजना जाहीर केली होती़ ही योजना १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीपर्यंत सुरू राहणार होती.योजनेची मुदत संपत आली असतानाही मोठ्या खासगी हॉस्पिटलनी उत्पन्नाची माहिती सादर न करता अघोषित उत्पन्न लपवून ठेवल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या दोन पथकांनी बुधवारी सकाळपासून या कारवाईला सुरुवात केली़ शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली़ (प्रतिनिधी)
>पिंपरी-चिंचवडमध्ये २५ हजार करदात्यांना नोटीस
मालमत्ताधारक करदात्याला चालू वर्षातील अर्जित मूल्य दाखवून त्यावर कर भरावा लागणार आहे़ योजनेद्वारे करदात्यांची सर्व माहिती गुप्त ठेवली जाणार असतानाही करदात्यांनी कर थकविल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील २५ हजार करदात्यांना कर न भरल्यामुळे नोटीस पाठविली आहे़ करदात्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी कर भरला नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: The heels of the hospital's heels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.