हेरातचा हल्ला मोदींच्या शपथविधीला विरोधासाठी

By admin | Published: June 5, 2014 12:29 AM2014-06-05T00:29:37+5:302014-06-05T00:29:37+5:30

भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मे रोजीच्या भव्य शपथविधी समारंभाला विरोध म्हणून त्याच सुमारास हा हल्ला करण्यात आला.

Herat attacks against Modi's swearing-in | हेरातचा हल्ला मोदींच्या शपथविधीला विरोधासाठी

हेरातचा हल्ला मोदींच्या शपथविधीला विरोधासाठी

Next
>नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील हेरात येथील भारताच्या वाणिज्य दूतावासावर नुकताच झालेला हल्ला हा लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी संघटनेचा कट असून, भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मे रोजीच्या भव्य शपथविधी समारंभाला विरोध म्हणून त्याच सुमारास हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दूतावासातील कर्मचा:यांना ओलिस ठेवण्याचीही योजना होती, तसेच दूतावासाला वेढा घातला जाणार होता; पण हल्लेखोर मारले गेल्याने ही योजना सफल झाली नाही. हल्ला झाल्यानंतर हेरात दूतावासातील सुरक्षा अधिका:यांनी हल्ल्याचा प्रकार व मृतदेहांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. 
अफगाणिस्तानचे मावळते अध्यक्ष हमीद करझाई यांनी या हल्ल्यामागे लष्कर असल्याचे म्हटले आहे. लष्कर-ए-तोयबाचे हल्लेखोर प्रशिक्षित असून, शस्त्रसज्ज असतात. त्यांचे लक्ष्य ठरलेले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीआधी तीन दिवस हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर दीर्घकाळ थांबण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांच्याकडे एके-47 रायफली, काडतुसाच्या सहा फैरी, तोफगोळ्यांचा मारा करण्याचे साहित्य होते. तसेच त्यांच्याकडील मोबाईलमध्ये दोन सीमकार्डे बसविण्याची सोय होती. त्यात बीबीसी, अॅरियाना टीव्ही स्टेशन व काबूलमधील भारतीय दूतावासाचे फोन नंबर होते. 
पहाटे 4 पासून गोळीबार सुरू झाला. आयटीबीपीच्या जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे हल्लेखोरांना शेजारच्या घरात आश्रय घ्यावा लागला. अफगाण सैनिकही लगेच सहभागी झाले. आठ तास चाललेल्या गोळीबारात हल्लेखोरांचा बीमोड झाला; पण एक हल्लेखोर निसटला असण्याची शक्यता आहे, कारण मृतदेह तीनच मिळाले आहेत. या हल्लेखोरांनी स्फोटकांची जाकिटे घातलेली नव्हती. ती तालिबानची पद्धत आहे. त्यामुळे हे लष्कर-ए- तोयबाचे  प्रशिक्षित हल्लेखोर असावेत या तर्काला पुष्टी मिळते.  अफगाणिस्तानची  पुनर्रचना  करण्याच्या कामात भारताचा मोठा सहभाग असल्याने, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयमध्ये अस्वस्थता आहे.  (वृत्तसंस्था)
 

Web Title: Herat attacks against Modi's swearing-in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.