शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

हेरातचा हल्ला मोदींच्या शपथविधीला विरोधासाठी

By admin | Published: June 05, 2014 12:29 AM

भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मे रोजीच्या भव्य शपथविधी समारंभाला विरोध म्हणून त्याच सुमारास हा हल्ला करण्यात आला.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील हेरात येथील भारताच्या वाणिज्य दूतावासावर नुकताच झालेला हल्ला हा लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी संघटनेचा कट असून, भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मे रोजीच्या भव्य शपथविधी समारंभाला विरोध म्हणून त्याच सुमारास हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दूतावासातील कर्मचा:यांना ओलिस ठेवण्याचीही योजना होती, तसेच दूतावासाला वेढा घातला जाणार होता; पण हल्लेखोर मारले गेल्याने ही योजना सफल झाली नाही. हल्ला झाल्यानंतर हेरात दूतावासातील सुरक्षा अधिका:यांनी हल्ल्याचा प्रकार व मृतदेहांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. 
अफगाणिस्तानचे मावळते अध्यक्ष हमीद करझाई यांनी या हल्ल्यामागे लष्कर असल्याचे म्हटले आहे. लष्कर-ए-तोयबाचे हल्लेखोर प्रशिक्षित असून, शस्त्रसज्ज असतात. त्यांचे लक्ष्य ठरलेले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीआधी तीन दिवस हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर दीर्घकाळ थांबण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांच्याकडे एके-47 रायफली, काडतुसाच्या सहा फैरी, तोफगोळ्यांचा मारा करण्याचे साहित्य होते. तसेच त्यांच्याकडील मोबाईलमध्ये दोन सीमकार्डे बसविण्याची सोय होती. त्यात बीबीसी, अॅरियाना टीव्ही स्टेशन व काबूलमधील भारतीय दूतावासाचे फोन नंबर होते. 
पहाटे 4 पासून गोळीबार सुरू झाला. आयटीबीपीच्या जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे हल्लेखोरांना शेजारच्या घरात आश्रय घ्यावा लागला. अफगाण सैनिकही लगेच सहभागी झाले. आठ तास चाललेल्या गोळीबारात हल्लेखोरांचा बीमोड झाला; पण एक हल्लेखोर निसटला असण्याची शक्यता आहे, कारण मृतदेह तीनच मिळाले आहेत. या हल्लेखोरांनी स्फोटकांची जाकिटे घातलेली नव्हती. ती तालिबानची पद्धत आहे. त्यामुळे हे लष्कर-ए- तोयबाचे  प्रशिक्षित हल्लेखोर असावेत या तर्काला पुष्टी मिळते.  अफगाणिस्तानची  पुनर्रचना  करण्याच्या कामात भारताचा मोठा सहभाग असल्याने, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयमध्ये अस्वस्थता आहे.  (वृत्तसंस्था)