भटकळसाठी विमान अपहरणाचा कट?

By admin | Published: August 13, 2014 04:17 PM2014-08-13T16:17:51+5:302014-08-13T20:22:54+5:30

इंडियन मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनेचा सह - सहसंस्थापक यासिन भटकळ याला सोडवण्यासाठी दहशतवादी संघटनांने विमान अपहरणाचा कट रचला असल्याची माहीती सुरक्षा यंत्रणांना मिळाली.

The hijacked plane for hijacking? | भटकळसाठी विमान अपहरणाचा कट?

भटकळसाठी विमान अपहरणाचा कट?

Next
>ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १३ - इंडियन मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनेचा सह - संस्थापक यासिन भटकळ याला सोडवण्यासाठी दहशतवादी संघटनांने विमान अपहरणाचा कट रचला असल्याची माहीती सुरक्षा यंत्रणांना मिळाली. यामुळे मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. 
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल ) कंपनीला पत्र पाठवण्यात आले असून या पत्रामध्ये दहशतवादी विमान अपहरणाचा कट रचत असल्याचे म्हटले आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपला असल्याने सुरक्षा व्यवस्थेतेत कोणताही हलगर्जीपणा होवू नये यासाठी सुरक्षा यंत्रणाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून येत्या २० ऑगस्टपर्यंत मुंबई विमानतळावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच रेडीओ कॅब्स अंतर्गत होणारी ऑनलाइन बुकींगही तात्पुरती स्थगती देण्यात आली आहे. दरम्यान, यासिन भटकळ याला ऑगस्ट २०१३ साली अटक करण्यात आली होती. 

Web Title: The hijacked plane for hijacking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.