MeToo: अरेला कारे केल्याशिवाय ‘ती’चा निभाव लागेल कसा?- डॉ. लक्ष्मी गौतम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:40 PM2018-10-27T23:40:35+5:302018-10-27T23:46:20+5:30
भविष्यात ‘‘ती’’ तिचे स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे असेल तर मात्र अरेला कारे करण्याचा खंबीरपणा अंगी असायलाच हवा, अशी भूमिका डॉ. लक्ष्मी गौतम यांनी व्यक्त केली.
पुणे : जबनाने कुठल्याही पाठिंब्याशिवाय अगदी कमी वयात हिमाचल प्रदेशातील एका गावातील सरपंचपदी उडी घेतली. वृंदावनमधील घाटावर अनेक बेवारशी प्रेते पडलेली दिसायची. त्यांना कुणी हात लावायला तयार नसायचे अशा प्रेतांना अग्नी देऊन मुक्ती देण्याचे काम करणाऱ्या डॉ. लक्ष्मी गौतम या सर्वांनी भविष्यात ‘‘ती’’ तिचे स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे असेल तर मात्र अरेला कारे करण्याचा खंबीरपणा अंगी असायलाच हवा, अशी भूमिका व्यक्त केली.
लोकमत वुमन समीटमध्ये ‘‘नई शुरुवात - द फर्स्ट आॅफ हर कार्इंड’’ विषयावरील परिसंवादात भारतातील सर्वात कमी वयाच्या सरपंच जबना चौहान, एशिया फर्स्ट आॅल वुमन टॅक्सी सर्व्हिस फोर्शेच्या संस्थापक रेवती रॉय, वृंदावनच्या आमदार व कनकधारा फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. लक्ष्मी गौतम आणि शीतल क्रिएशन्सच्या शीतल बियानी आदी सहभागी झाल्या होत्या.