शाॅर्टसर्किटमुळे एच.पी.गॅसच्या ट्रकने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 10:17 AM2016-10-25T10:17:04+5:302016-10-25T10:17:04+5:30

तब्बल 306 सिलेंडर वाहून नेणाऱ्या एच.पी.गॅस या कंपनीच्या ट्रकच्या केबिनमधे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून ट्रेकचे नुकसान झाले

The HP Gas truck took the stomach due to shortscrew | शाॅर्टसर्किटमुळे एच.पी.गॅसच्या ट्रकने घेतला पेट

शाॅर्टसर्किटमुळे एच.पी.गॅसच्या ट्रकने घेतला पेट

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २५ -  तब्बल 306 सिलेंडर वाहून नेणाऱ्या एच.पी.गॅस या कंपनीच्या ट्रकच्या केबिनमधे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून ट्रेकचे नुकसान झाले. हि घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास कात्रज दूध डेअरी समोर घडली. अचानक धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. तातडीने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास सदर घटनेची माहिती दिली.
कात्रज येथील अग्निशमन दलाच्या जवानांना वर्दि मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. ट्रक सिलेंडरने भरलेला पाहून केबिनमधे लागलेली आग सिलेंडरपर्यंत पोहचणार नाही याची दक्षता घेत पाण्याचा मारा करत आग पूर्ण विझवली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
 
या कामगिरीमधे कात्रज अग्निशमन केद्रांचे केंद्रप्रमुख संजय रामटेके ; तांडेल - भाऊ शिंदे , चालक - गणेश भंडारे तसेच जवान निलेश लोणकर, महादेव मांगडे, रामदास शिंदे, किरण पाटील यांनी सहभाग घेतला.

Web Title: The HP Gas truck took the stomach due to shortscrew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.