हगणदारीच्या जागेत फुलतेय लोकसहभागातून बाग !

By admin | Published: August 27, 2016 04:50 PM2016-08-27T16:50:33+5:302016-08-27T16:58:28+5:30

शहरातील नाल्याकाठी उघड्यावर शौचास बसणा-यांना चाप बसवित लोकसहभागातून येथे बाग फुलविण्यात येत आहे

Huge crowd of people in the hired land! | हगणदारीच्या जागेत फुलतेय लोकसहभागातून बाग !

हगणदारीच्या जागेत फुलतेय लोकसहभागातून बाग !

Next
>- अनिल गवई / ऑनलाइन लोकमत
खामगाव (बुलडाणा), दि. 27 - शहरातील नाल्याकाठी उघड्यावर शौचास बसणा-यांना चाप बसवित लोकसहभागातून येथे बाग फुलविण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात २१ वृक्षांची आणि फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. तर दुसºया टप्प्यातील २९ वृक्ष लागवडीचे काम प्रगतीपथावर असून, दोनशे वृक्षाच्या लागवडीसाठी ओंकारेश्वर स्मशानभूमी नजीक रस्त्याच्या दुतर्फा मजबुत तार फॅन्सींग केल्या जात आहे. या उपक्रमामुळे स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागत असल्याचे दिसून येते.
 
शहरातील ओंकारेश्वर स्मशानभूमीनजीक नगरसेवक प्रविण कदम यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून घाण पाण्यातून हिरवळ फुलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात २१ झाडांची लागवड करण्यात आली असून, दुसºया टप्प्यात २९ लागवडीची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे लवकरच ओंकारेश्वर स्मशानभूमीपासून चिखली रोडपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावण्याची तयारी करण्यात आली आहे. झाडांच्या संगोपनाचीही दखल घेण्यात येत असून, मजबूत लोखंडी जाळीची फॅन्सीगही लोकसहभागातून केल्यात आहे. कडू निंब, पिंपळ, वड, कडू बदाम यासारख्या वृक्षासोबतच गुलाब आणि इतर शोभीवंत झाडेही या ठिकाणी लावण्यात येत आहे.
 
परिसर हगणदारी मुक्त करण्यासाठी, ओंकारेश्वर स्मशानभूमी नजीकच्या परिसरात दुतर्फा वृक्षारोपण केल्या जात आहे. वृक्ष जगविण्यासाठी घाण पाण्याचा वापर करण्यात येत असून, सुरक्षेसाठी लोखंडी जाळी लोकसहभागातून बसविण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागत आहे.
- प्रवीण कदम
 
जुलाब टाळण्यासाठी फुलवा गुलाब!
हगणदारीच्या ठिकाणी नाल्याकाठी घाण पाण्याचा वापर करून हिरवळ फुलवण्यात येत आहे. या अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी आकर्षक घोषवाक्यांच्या माध्यमातून प्रबोधन केल्या जात आहे. यामध्ये ‘घाण करून वाढविण्यापेक्षा जुलाब; स्वच्छता करून फुलवा गुलाब’ या सारख्या म्हणीचाही वापर करण्यात येत आहे. तसेच विविध सुविचारांचे फलक याठिकाणी लावण्यात आले आहेत.
 
शंभरटक्के संगोपनाचे प्रयत्न!
नाल्यातील घाण पाण्यावर वृक्ष संगोपन करतानाच, हगणदारीचे आपोआप निर्मुलन होत असून, या झाडांची योग्य ती निगा राखण्यासाठी वृक्ष लागवडीसाठी दोन फूट अंतरापर्यंत विटांचे पक्के बांधकाम (आळे)  तयार केल्या जात आहेत. सोबतच संपूर्ण वृक्षांना लोखंडी जाळीचे पक्के फॅन्सींगही करण्यात येत आहे.
 
वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट- २००
पहिल्या टप्यात लागवड झालेले वृक्ष- २१
दुसºया टप्यात लागवड होणारे वृक्ष- २९
तिसºया टप्यात लागवड होणारे वृक्ष- ३६
सपाटीकरण करून लावण्यात येणारे वृक्ष- ४२
अंतिम टप्प्यात लावण्यात येणारे वृक्ष -७२
 

Web Title: Huge crowd of people in the hired land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.