‘अच्छे दिन’ न आल्यास अराजक

By admin | Published: July 24, 2015 02:25 AM2015-07-24T02:25:31+5:302015-07-24T02:25:31+5:30

आता मोदीच देशाला वाचवतील, लोकांचं कल्याण करतील, अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळेच या आशेच्या जर चिंधड्या उडाल्या तर काय

If not 'good days' chaotic | ‘अच्छे दिन’ न आल्यास अराजक

‘अच्छे दिन’ न आल्यास अराजक

Next

मुंबई : आता मोदीच देशाला वाचवतील, लोकांचं कल्याण करतील, अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळेच या आशेच्या जर चिंधड्या उडाल्या तर काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही. बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचे तर फक्त अराजक आणि अराजकच माजेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलखतीत दिला आहे.
युती मजबूत करण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न व्हायला पाहिजेत. शिवसेना ही सत्तेकरिता कधी युती करत नाही. निवडणुका असोत किंवा नसोत, चांगले दिवस असोत की नसोत एकदा मित्र म्हटले म्हणजे मित्र ही शिवसेनेची नीती आहे. शिवसेनाप्रमुखांनी ती आपल्याला शिकवली आहे, अशा शब्दांत भाजपाच्या स्वबळाच्या नाऱ्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष इकडे येतात व युतीचे राजकारण पुरे करा असे सांगतात. पण तिथे काश्मीरमध्ये मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहुना पाकधार्जिण्या पक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठे आश्चर्य असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. गोंदियातील काँग्रेस व भाजपा युतीवरही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ठाकरे कधीच निराश होत नाहीत. केंद्रात व राज्यात अशा दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेत सहभागी आहे. पण ही सरकारे शिवसेनेची नाहीत. पूर्वी एनडीएतील घटक पक्षांना विश्वासात घेऊन अटलजी सरकार चालवत होते. चंद्राबाबू, रामविलास पासवान असे नेते एनडीएत आले व गेले. ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशा प्रकारे जर सरकार चालवणार असाल तर तशा राजकारणात शिवसेना पडणार नाही, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: If not 'good days' chaotic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.