सत्तेत वाटा न दिल्यास घटकपक्षांचा बाहेर पडण्याचा इशारा

By admin | Published: May 9, 2015 02:30 PM2015-05-09T14:30:27+5:302015-05-09T14:52:34+5:30

राज्याच्या सत्तेत दहा टक्के वाटा न मिळाल्यास महायुतीतून बाहेर पडू असा इशारा घटकपक्षांनी भाजपाला दिला आहे.

If you do not get the share of power, | सत्तेत वाटा न दिल्यास घटकपक्षांचा बाहेर पडण्याचा इशारा

सत्तेत वाटा न दिल्यास घटकपक्षांचा बाहेर पडण्याचा इशारा

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ९ - राज्याच्या सत्तेत १० टक्केवाटा न मिळाल्यास महायुतीतून बाहेर पडू असा इशारा घटकपक्षांनी भाजपाला दिला आहे. राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्ता येऊन सहा महिने उलटल्यावरही सत्तेत वाटा न मिळाल्याने तसेच दुर्लक्षित वागणुकीमुळे नाराज झालेल्या ( रिपाईं, स्वाभिमानी संघटना, शिवसंग्राम आणि रासप) घटकपक्षांची आज मुंबईत बैठक पार पडली. रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि विनायक मेटे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली असून मित्रपक्षांच्या मागण्यांबबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी घटकपक्षांच्या सर्व नेत्यांनी भाजपकडून आपल्याला अन्यायाची वागणूक मिळाल्याचे सांगितले. आम्हाला मिळालेल्या आश्वासनाप्रमाणे सत्तेत दहा टक्के वाटा, चारही घटकपक्षांच्या नेत्यांना मंत्रीपदे आणि राज्यातील महामंडळामध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

'आम्ही सत्तेसाठी सरकारसोबत नाही, पण सत्ता कोणामुळे मिळाली याची भाजपने आठवण ठेवावी आणि दिलेलं आश्वासन लक्षात ठेवावं. आमच्यामुळेच भाजपाला मोटं यश मिळालं नाहीतर शिवसेनेच्या ५० जागा आणखी वाढल्या असत्या. त्यामुळे भाजपाने आपला शब्द पाळाव' असे रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले.
तर '  निवडणुकीपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी साद दिल्यामुळे आम्ही भाजपासोबत आलो. पण मुंडे नसल्याने भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. निर्णयाचा अधिकार ज्याच्याकडे आहे, अशाच व्यक्तींनी आता आमच्याशी चर्चा करायला यावे' असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी सांगितले.
 

Web Title: If you do not get the share of power,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.