मराठी माणसाचा अपमान कराल तर सोडणार नाही, मनसे कार्यकर्त्यांचा सुब्रमण्यम स्वामींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 11:36 AM2017-10-29T11:36:59+5:302017-10-29T11:37:03+5:30

डोंबिवली - यूपीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच असल्याची फालतू टीका राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे केली.

If you insult the Marathi person, you will not leave it, the MNS workers will be alert to Subramaniam Swami | मराठी माणसाचा अपमान कराल तर सोडणार नाही, मनसे कार्यकर्त्यांचा सुब्रमण्यम स्वामींना इशारा

मराठी माणसाचा अपमान कराल तर सोडणार नाही, मनसे कार्यकर्त्यांचा सुब्रमण्यम स्वामींना इशारा

googlenewsNext

डोंबिवली - यूपीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच असल्याची फालतू टीका राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे केली. सुब्रमण्यम स्वामी हे डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या एका खासगी कार्यक्रमासाठी जो काही मराठी अस्मिता जपणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नाने आयोजित केला होता तिथे आले होते. यावेळी विविध मुद्द्यांवर बोलताना त्यांनी मराठीसम्राट मा. राज ठाकरे यांच्या वाढत्या प्रभावाला घाबरून फालतू टीका केली.

राज ठाकरे व एक यूपीचा रिक्षावाला यांचा डीएनए तपासला तर दोघांचा डीएनए नक्कीच एक निघेल, असे वक्तव्य त्यांनी या जाहीर कार्यक्रमात केले. याशिवाय यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज यांनी आपल्याला डीएनएबाबत आव्हान केल्यास राज यांचा डीएनए यूपीचाच असल्याचे सिद्ध करून दाखवू, असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच राज यांना हे माहीत असल्यानेच ते सध्या यूपीवाल्यांच्या विरोधात बोलत नसल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

दरम्यान स्वामी यांच्या वक्तव्यामुळे संतापलेले मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम ह्यांच्या कानावर ही बातमी आली तेव्हा ते एकटे कार्यक्रम ठिकाणी पोहोचले व थेट स्वामींना राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला. त्यावेळी कदम यांनी स्वामीना उद्देशून तुम्ही मराठी माणसासाठी काय केले आहे .राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जे काम केले आहे. ते तुम्ही केले आहे का. तुम्हाला त्यांचा डीएनए काढण्याचा अधिकार काय, असा सवाल उपस्थित केला. तसेच सत्ताधारी तुम्ही, एकहाती सत्ता आहे. मग शहर सुंदर करा फेरीवालामुक्त करा, असली स्टेटमेंट करून आपापसात भांडण का लावता, असा जाब विचारला. त्यावेळेस स्वामी बोलले तुम लोग युपीके टॅक्सीवालेको मारते हो, तेव्हा राजेश कदम ह्यांनी मुंबई व परिसराची कॅप्यासिटी संपली आहे, लोंढे थांबवा ह्या मा. राजसाहेबांच्या इशाऱ्याला आता एका अहवालाने सुद्धा पुष्टी दिली त्यावर अभ्यास करा, तसेच त्यांना तुमच्या प्रांतात येऊन मराठी माणसाने कायदे कानून तोडले तर तुम्ही सहन कराल का..? मराठी माणूस म्हणजे मराठी भाषा, मराठी अस्मिता व मराठी भूमीवर जो प्रेम करतो तो मराठी मग तो यूपीवाला असो की बिहारवाला ही व्याख्या समजावून सांगितली. जवळपास तीन ते चार मिनिटे राजेश कदम स्वामींना त्यांच्याच बॉडीगार्डच्या घोळक्यात घुसून समजावत होते. मनसे देशाला मानतो पण महाराष्ट्राची वेळ येईल तिथे प्राधान्य आमच्या महाराष्ट्राला, काश्मीरमध्ये पण आम्ही घुसायला तयार आहोत. पण उगीच तुम्ही अश्या फालतू स्टेटमेंट करून राज्याराज्यात भांडणे लावू नका, असे सुनावल्यावर स्वामींची बोलतीच ह्यावेळी बंद झाली होती. ह्यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब हे देखील तेथे स्वामींसोबत चहापाणी करत होते, मात्र राजेश कदम यांच रौद्ररूप पाहून व कदाचित मराठी माणूस म्हणून व राजसाहेबांबाबतचे जे खडे बोल स्वामींना एेकवले ते त्यांना पटत असल्यामुळे राज्यमंत्र्यांनी देखील राजेश कदम यांची समजूत काढून संयमाने विषय हाताळला..

मराठी डोंबिवलीत येऊन मराठी हृदयसम्राटांविषयीचे वेडेवाकडे बोल सहन केले जाणारच नाही, मागे देखील रोटरीच्या अश्याच कार्यक्रमाला डोंबिवलीतल्या सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात लालूप्रसाद यादवला आमंत्रित केले होते, मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले होते, लालूला मनसे कार्यकर्त्यांपासून तोंड लपवत छपवत डोंबिवलीच्या बाहेर घेऊन जाण्याची वेळ आली होती.
डोंबिवलीतल्या सामाजिक संस्थांना विनंती, महाराष्ट्रात व मराठी असलेले व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या असंख्य प्रमुख वक्त्यांची येथे कमी नाही, स्वामी, लालू सारख्या बेडगी व मराठी माणसांचा द्वेष करणारे, अपमान करणारे पाहुणे हवेतच कश्याला..? येवढा तरी मराठीचा अभिमान बाळगा ही विनंती. मा.राज ठाकरे जे करतात ते मराठी अस्मितेसाठीच करत आहेत भले आम्हाला तुमचे मतदान नका करू पण मराठी माणसाचा अपमान सुध्दा सहन नका करू ही विनंती.

Web Title: If you insult the Marathi person, you will not leave it, the MNS workers will be alert to Subramaniam Swami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.