अमोल जायभाये/ खामगाव
राज्यात दलित व आदिवासींवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. राज्यत सर्वात जास्त ४0६ घटनांची नोंद विदर्भात २0१३ मध्ये झाली आहे. राज्यात गेल्या वर्षभरात १६३४ घटना घडल्या आहेत. मात्र त्यातील ४0६ घटना एकट्यर विदर्भातील आहेत. २0१२ मध्ये राज्यात १0८९ घटनांची नोद होती. त्यावेळी विदर्भात २६४ घटना घडल्या होत्या. राज्यावर फुले-शाहू आंबेडकरांच्या विचारांचे सरकार असल्याचा दावा करणार्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत गेल्या तीन वर्षात दलितांवरील अ त्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या घटनांमध्ये खुन मारहान, बलात्कार, सामूहिक बहिष्कार, जातीवाचक, अवमानकारक शिवीगाळ अशा घटनांचा समावेश आहे. जातीवाचक शिवीगाळ बर्याचदा अनावधानाने घडलेल्या घटना असतात. परंतु खून, बलात्कार, बहिष्कार, मारहाण या गंभीर घटना आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, मुंबई-कोकण, यांच्या पेक्षा विर्दभात जास्त घटना घडल्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न तयार झाला आहे. विदर्भा नंतर पुणे जिल्यात सर्वाधिक १३४ घटना घटल्या आहेत. परभणी मध्ये ९५, सोलापूर जिल्यात ७२, सातारा जिल्यात ६५, नांदेड मध्ये ७८ तर यवतमाळ जिल्ह्यात ८८ घटना घडल्या आहेत. आदिवासींवरील आत्याचारातही गेल्या तीन वर्षात वाढ झाली असून वर्षभरात ४१८ घटनांची नोंद झाली आहे. दलित अ त्याचाराची प्रकरणे वाढत असल्याने महाराष्ट्र सरकार समोर मोठा प्रश्न उभा राहीला आहे. विदर्भात खैरलांजी मध्ये घडलेली घटना अंगावर शहारे उभे करणारी होती. यानंतरही राज्याच्या विविध भागामध्ये अनेक घटना घडल्या आहेत.