नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही; भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 06:03 AM2021-06-12T06:03:38+5:302021-06-12T06:04:01+5:30
subramanian swamy : एवढेच नाही तर पाकिस्तान आणि नियंत्रण (एलओसी) रेषेसारख्या संवेदनशील मुद्यांवरही स्वामी भाष्य करीत आहेत.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी केंद्र सरकारवर अंतर्गत सुरक्षा आणि विदेशी मुद्यावरून टीका करीत असतात. त्यांनी मोदी सरकारला चीनच्या डावपेचांबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता.
एवढेच नाही तर पाकिस्तान आणि नियंत्रण (एलओसी) रेषेसारख्या संवेदनशील मुद्यांवरही स्वामी भाष्य करीत आहेत. यादरम्यान, लडाखस्थित प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएलसी) भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी होत नसल्याचा दावा करणाऱ्या एका अहवालावर स्वामी म्हणाले की, “मला असे जाणवत आहे की, संघर्षाच्या ठिकाणावरून फक्त भारत मागे व चीन पुढे सरकला आहे.”
ट्विटरवर एका यूजरने सुब्रमण्यम स्वामी यांना टॅग करताना म्हटले की,“संघर्षाच्या एक वर्षानंतरही भारत आणि चीन यांना आपल्यातील तणाव कमी करायचे आहे.” यूजरने ट्विटमध्ये एक अहवालही शेअर केला. त्यात म्हटले की, लडाखस्थित नियंत्रण रेषेवर दोन्ही देशात स्थिती तणावपूर्ण बनलेली आहे. यावर सुब्रमण्यम स्वामी म्हटले की,“आता मला जाणवत आहे की, फक्त भारताने माघार घेतली. ”
जबाबदारी घेतली नाही
- चीनविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्वामी यांनी सतत म्हटलेले आहे. गेल्या महिन्यात त्यांनी म्हटले होते की, चीन भारत आणि भूतानची जमीन बळकावत आहे.
- या परिस्थितीत घाबरून जाऊन चीनला उत्तर दिले जाऊ शकत नाही. काही दिवसांनी स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य करीत ट्विटरवर म्हटले होते की, या
सरकारमधील कुणीही चीन लडाखमध्ये भारताची जमीन बळकावत असताना त्याला अडविण्याची जबाबदारी घेतली नाही.