भारतीय रिअल्टी, सोन्याची चमक कायम
By admin | Published: June 5, 2014 12:35 AM2014-06-05T00:35:16+5:302014-06-05T00:35:16+5:30
जगातील जवळपास सर्वच प्रमुख अर्थव्यवस्था मंदीचा सामना करीत असताना भारतात गेल्या पाच वर्षामध्ये स्थावर मालमत्ता आणि सोन्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे.
Next
>नवी दिल्ली : जगातील जवळपास सर्वच प्रमुख अर्थव्यवस्था मंदीचा सामना करीत असताना भारतात गेल्या पाच वर्षामध्ये स्थावर मालमत्ता आणि सोन्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्यामुळे या दोन क्षेत्रंमध्ये चमक दिसत असली तरी कंपन्यांमधील गुंतवणूक घटत असल्यामुळे त्यांच्या भागभांडवलामध्ये घट झालेली दिसून येत आहे.
केंद्रीय सांख्यिकी संघटन (सीएसओ)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सन 2क्क्8 पासून जगभरातील अनेक अर्थव्यवस्था या मंदीचा सामना करीत असताना याच काळात भारतामध्ये मात्र सोने आणि स्थावर मालमत्तेची खरेदी मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे दिसून आले आहे. मात्र याच कालावधीत कंपन्यांमधील गुंतवणूक कमी झाल्यामुळे कंपन्यांचे भागभांडवल कमी होत असल्याचेही दिसून आले आहे.
भारतीय नागरिकांचे सोन्याबाबतचे प्रेम हे सर्वज्ञात आहे. लगAसमारंभ, विविध सण आणि समारंभासाठी तसेच गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी केली जाते. त्याचप्रमाणो स्थावर मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक ही कायमस्वरूपी वाढीव लाभ देणारी असते, असाही एक मतप्रवाह असून त्यामुळेच गेल्या काही वर्षामध्ये स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे.
15 सप्टेंबर, 2क्क्8 रोजी अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाची बॅँक असलेल्या लेहमन ब्रदर्सची दिवाळखोरी जाहीर झाली आणि त्यानंतर जगावर आर्थिक मंदीचे सावट आले. सन 2क्क्8 मध्ये भारतातील खासगी कंपन्यांमधील भांडवल हे देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 18.8 टक्के असे सर्वाधिक होते. सन 2क्13 मध्ये ते एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 9.9 टक्क्यांर्पयत खाली आले आहे. यामुळे देशातील कंपन्यांना खेळत्या भांडवलाची कमतरता जाणवत असून त्यांची उत्पादनक्षमता कमी झाल्याचे दिसून येत आहे.
लेहमन संकट आले तेव्हा भारताची सोने आणि स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक 48 टक्के होती. त्यानंतर त्यामध्ये मोठी वाढ झालेली दिसून येते. यावेळी भारतीयांची बचत, म्युच्युअल फंडस्, शेअर बाजार अशा सर्व प्रकारांतील गुंतवणूक 52 टक्के होती ती आता 32.4 टक्क्यांर्पयत घसरली आहे.
सन 2क्क्8 ते 2क्13 या काळात कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली तसेच मागणी घटल्याने मालाला फारसा उठाव राहिलेला नसल्याने कंपन्यांच्या नफ्यात घट होताना दिसत आहे. या कालावधीत मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या बॅँक आणि वित्तीय कंपन्या वगळता 2क्क् कंपन्यांच्या सरासरी नफ्यात घट होत आहे. 2क्क्8 मध्ये सरासरी नफा 19.8 टक्क्यांवरून आता 15.6 टक्क्यांर्पयत खाली आला आहे. त्याचा फटका कंपन्यांमधील गुंतवणूक कमी होण्यात झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गेल्या पाच वर्षामध्ये शहरी भागातील नागरिकांपेक्षा ग्रामीण नागरिकांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीचा दर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.
खाद्यपदार्थाच्या वाढीव किमती, शेतजमिनीला मिळत असलेला अधिक दर, शेतमालाच्या घाऊक मूल्यात झालेली वाढ, ग्रामीण भागात सुरू असलेले रोजगार हमी कार्यक्रम, तसेच रस्ता निर्मिती यामुळे या भागातील नागरिकांचे उत्पन्न वाढताना दिसत आहे.
आकाशाला भिडणारी महागाई आणि आर्थिक मंदी यामुळे पगारदार शहरी नागरिकांच्या उत्पन्नामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये फारशी वाढ झालेली दिसत नाही.
4यामुळे शहरी पगारदारांना या काळात गुंतवणुकीला फारसा वाव मिळालेला नाही. या व्यक्ती आपले उत्पन्न वाढविण्यासाठी कोणते विविध मार्ग अवलंबता येतील याचाच शोध घेताना दिसून येत आहेत.