- प्रकाश गायकरपिंपरी - आयुष्यामध्ये प्रत्येकालाच काही ना काही छंद असतो. आपला छंद जोपासण्यासाठी संग्राहक अतूट मेहनत घेत असतात. देहूरोड येथील संदीप बोयत यांनीही आगळा वेगळा छंद जोपासला आहे. पोस्टाची तिकिटे जमवून त्यांनी आपला एक वेगळाच छंद समाजासमोर ठेवला आहे. १९४७ पासूनच्या पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह त्यांनी केला आहे. स्वातंत्र्यासाठी प्राणाचीबाजी लावणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या नावाने काढलेली तिकिटे त्यांनी आपल्या संग्रही ठेवली आहेत. स्वातंत्र्यसेनानींच्या तिकीटसंग्रहामागे पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचा हेतू आहे.संदीप यांचे आजोबा रिसाला नंदू हे स्वातंत्र्यसेनानी होते. सुभाषचंद्र बोस यांच्या बरोबर ते स्वातंत्र्यसेनानी म्हणून काम करीत असल्याचा दावा संदीप यांनी केला आहे. आजोबांनी बलिदान दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या तिकिटांचा संग्रह संदीप यांनी अविरतपणे पुढे सुरू ठेवला. त्या छंदामध्ये ते इतके गुंतून केले की खुद्द इंडिया बुक रेकॉर्डला त्यांच्या या छंदाची दखल घ्यावी लागली. संदीप हे चित्रपटसृष्टीमध्ये सहायक कॅमेरामन व कलाकार म्हणून काम करतात. स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यसेनानी व भारताच्या स्वातंत्र्याला अनुसरून एकून १५ पोस्टाची तिकिटे काढण्यात आली आहेत. त्या सर्व तिकिटांचा संग्रह संदीप यांच्याकडे आहे.महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजगुरू, भगतसिंग, विनायक सावरकर अशा स्वातंत्र्यासाठी झगडणाºया थोर व्यक्तींच्या तिकिटांचा संग्रहात प्रामुख्याने समावेश आहे. तर १९६५ चे युद्ध, स्वातंत्र्यप्राप्तीचे २५ वर्ष पूर्ण, राष्ट्रपती अंगरक्षक, पहिले विमान उड्डाण अशा तिकिटांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवाजीमहाराज, संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, महर्षि वाल्मीकी, साईबाबा या तिकिटांचाही संग्रह त्यांनी केला आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक यांच्या नावाने निघालेल्या तिकिटांचाही संग्रह करण्यात आला आहे. त्यामध्ये हॉलीवूड, हिंदी, मराठी, दक्षिणात्य सिनेमांच्या कलाकारांच्या तिकिटांचा समावेश आहे.दादासाहेब फाळके, डॉ. व्ही. शांताराम, डॉ. राजकुमार अशा दिग्गज कलाकारांच्या तिकिटांचा संग्रह आहे. बॉलीवूडच्या १५० तिकिटांचा संग्रह केल्याचे औैचित्य साधत २०१६ मध्ये इंडिया बुक रेकॉर्डमध्ये त्यांच्या संग्रहाची नोंद करण्यात आली.माझ्या आजोबांकडून मला हा संग्रह करण्याची प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्यानंतर काढलेली तिकिटे देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा, अशी आहेत. मात्र, ती कालबाह्य होऊ नयेत. पुढच्या पिढीला या तिकिटांतून प्रेरणा मिळण्यासाठी हा संग्रह केला आहे. - संदीप बोयत, संग्राहकछंदाचे होतेय सर्वांकडून कौतुक४संदीप यांच्या या अनोख्या छंदासाठी अनेक मान्यवरांनी त्यांना शाबासकीची थाप दिली आहे. स्वातंत्र्य काळानंतर देशासाठी अभिमानास्पद असलेल्या घटना व सेनानींच्या तिकिटांचा संग्रह केल्याबद्दल लष्करी अधिकाºयांनी त्यांचा गौरव केला आहे. शहराच्या महापौरांपासून ते अनेक दिग्गजांनी या अनोख्या छंदाचे कौतुक केले आहे.
स्वातंत्र्यसेनानींच्या तिकिटातून प्रेरणा, संदीप बोयत यांच्याकडे १९४७ पासूनचा आगळावेगळा संग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 1:44 AM